अभिनेत्रींना का लागते ‘बॉडीगार्ड’ची गरज?

By Admin | Published: October 6, 2016 03:31 AM2016-10-06T03:31:25+5:302016-10-06T03:31:25+5:30

बॉलीवूडच्या तारका आपल्याला नेहमीच ‘बॉडीगार्ड’च्या ताफ्यात पाहायला मिळतात. मग चित्रपटाचे शूटिंग असो किंवा कार्यक्रम, अभिनेत्री बॉडीगार्डशिवाय बाहेर निघतच नाहीत.

Why actresses need Bodyguard? | अभिनेत्रींना का लागते ‘बॉडीगार्ड’ची गरज?

अभिनेत्रींना का लागते ‘बॉडीगार्ड’ची गरज?

googlenewsNext

बॉलीवूडच्या तारका आपल्याला नेहमीच ‘बॉडीगार्ड’च्या ताफ्यात पाहायला मिळतात. मग चित्रपटाचे शूटिंग असो किंवा कार्यक्रम, अभिनेत्री बॉडीगार्डशिवाय बाहेर निघतच नाहीत. त्याला कारणही तसेच आहे म्हणा. बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी त्यांना छेडछाडीला सामोरे जावे लागते. नुकताच अभिनेत्री हंसिका मोटवानीला अशाच एका प्रसंगाचा सामना करावा लागला. या आधीही काही अभिनेत्रींना अशा प्रसंगाना तोंड द्यावे लागले होते. अशाच काही गोष्टींचा आपण उलगडा करणार आहोत.

हंसिका मोटवानी
गोव्यातील एका बीचवर हंसिका तिच्या तेलुगू ‘उरिये उरिये’ चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण करत होती. हंसिकाच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, हे कळल्यावर तिला पाहण्यासाठी बरीच गर्दी तिथे जमली. काही क्षणांतच तिच्याभोवती चाहत्यांनी गराडा घातला. त्यातल्या एकाने हंसिकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात हंसिकाने त्याला बाजूला ढकलले. या प्रसंगानंतर या गाण्याचे शूटिंग दुसऱ्या लोकेशनवर करण्यात आले.

गुल पनाग : दिल्ली मॅरेथॉनमध्ये गुल धावत असताना तिच्या शेजारून काही मुले धावू लागली. काही जण तिच्या खूपच जवळ आले. त्यांनी गुल पनागला हात लावण्याचाही प्रयत्न केला होता.


मिनिशा लांबा
गोव्यामध्ये मिनिशा एक फोटोशूट करत होती. ही गोष्ट तिच्या चाहत्यांना समजताच ते चित्रीकरणाच्या स्थळी पोहोचले. काही जणांनी स्वाक्षरी आणि फोटो घेण्यासाठी मिनिशाभोवती गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेऊन एकाने मिनिशासोबत छेडछाड केली होती.

ईशा देओल : ईशा पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी गेली असता, तिला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. या वेळी गर्दीचा फायदा घेऊन एकाने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट ईशाच्या लक्षात येताच, तिने त्या माणसाला मागे ढकलून त्याच्या श्रीमुखात लगावली.

कोयना मित्रा : एका पंचतारांकित हॉटेलमध्ये न्यू इयर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये कोयनाचा डान्स परफॉर्मन्स होता. या वेळी एका व्यक्तीने तिच्यासोबत छेडछाड केली. हा प्रसंग एवढा भयानक होता की, कोयनाला तिथेच रडू कोसळले. यानंतर, आरोपीला पोलिसांनी अटक केली.

कतरिना कैफ
दुर्गापूजेसाठी कतरिनाला २००५मध्ये कोलकात्यात आमंत्रित करण्यात आले होते. पूजा संपल्यानंतर कतरिनाला चाहत्यांमुळे बाहेर पडणे अशक्य झाले होते. चाहत्यांनी इतकी गर्दी केली होती की, अंगरक्षकांनादेखील ही गर्दी नियंत्रित करता आली नाही. परिणामी, कतरिनाला छेडछाडीला सामोरे जावे लागले.

बिपाशा बासू
अहमदाबादला ‘राज ३’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिपाशा गेली असता, एका माणसाने चक्क तिचा स्कर्ट खाली खेचण्याचा प्रयत्न केला होता. या प्रसंगानंतर बिपाशा चिडून तिथून निघून गेली. एवढेच नाही तर तिला दुर्गापूजेच्या वेळीदेखील अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला होता.

सोनम कपूर
‘रांजणा’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सोनम कपूरला छेडछाडीचा सामना करावा लागला होता. एका ठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनम गेली असता, तिला चाहत्यांनी घेराव घातला. मात्र, धनुषने तिला चाहत्यांच्या गराड्यातून बाहेर काढले.

सुश्मिता सेन
एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनासाठी सुश्मिता एका शहरात गेली असता, तिला चाहत्यांनी गराडा घातला. या वेळी तिला गर्दीतून तिच्या गाडीपर्यंत जाणे कठीण झाले होते. या गर्दीचा सुश्मिताला प्रचंड मनस्ताप झाला होता.

Web Title: Why actresses need Bodyguard?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.