२० वर्षांनंतर कारगिलवीर मेजर डी.पी. सिंह यांनी पाहिला ‘सरफरोश’; आमिर खान झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 03:08 PM2019-05-30T15:08:38+5:302019-05-30T15:15:21+5:30
आमिर खानचा ‘सरफरोश’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. बॉक्सआॅफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. २० वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आमिर खानचा ‘सरफरोश’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. २० वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे, कारगिल युद्धात मरणाच्या दारातून परत आलेले, एक पाय नसताना व अनेक शारिरीक व्याधी असतानाही तब्बल २६ हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारे आणि नुकताच स्कायडायव्हिंग विक्रम करणारे निवृत्त मेजर डी. पी सिंह यांची पोस्ट. मेजर डीपी सिंह यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात आपला उजवा पाय गमावला होता. ऑपरेशन विजयमध्ये सहभागी असताना पाकिस्तान सीमेवर अखनूर सेक्टरमध्ये तोफगोळ्याच्या स्फोटोत डीपी सिंह गंभीर जखमी झाले होते. या उपचारादरम्यान त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून कापावा लागला होता. यानंतर त्यांना कृत्रिम पाय लावण्यात आला. या कृत्रिम पायासोबत डीपी सिंह १८ मॅराथॉनमध्ये धावले आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉडर््समध्ये त्यांचे नाव ‘पीपल ऑफ द इअर २०१६’मध्ये सामील आहे.
Exactly 20 years ago I watched movie #Sarfarosh of @aamir_khan and same I did just now.
— Major D P Singh (@MajDPSingh) 28 मई 2019
But
That time it was in theater.
Now on TV.
That time on both legs.
Now one less.
My last movie as intact before I joined unit for #OpVijay in May 1999.#memoriespic.twitter.com/rBmWtnhRX5
डीपी सिंह यांनी नुकतीच आमिरच्या ‘सरफरोश’ या चित्रपटाबद्दल एक भावूक पोस्ट लिहिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘२० वर्षांपूर्वी मी आमिर खानचा ‘सरफरोश’ हा सिनेमा पाहिला होता. २० वर्षांनंतर अगदी अलीकडे मी पुन्हा एकदा हा सिनेमा पाहिला. त्यावेळी हा सिनेमा मी थिएटरमध्ये बघितला होता आणि आज टीव्हीवर. त्यावेळी माझे दोन्ही पाय होते आणि आज एक. ऑपरेशन विजयची युनिट ज्वॉईन करण्यापूर्वीचा हा मी पाहिलेला अखेरचा सिनेमा होता.’
Dear @MajDPSingh, your post gave me goosebumps.
— Aamir Khan (@aamir_khan) 29 मई 2019
We salute your courage, strength and grit in the face of adversity.
Love and respect to you, Sir.
a. https://t.co/TYL8qurl1v
मेजर डीपी सिंह यांची ही पोस्ट आमिरने वाचली आणि तो भावूक झाला. ‘डियर मेजर डीपी सिंह, तुमची पोस्ट वाचून अंगावर शहारे आलेत. तुम्ही दाखवलेली हिंमत, धैर्याला सलाम...,’असे आमिरने यावर लिहिले.
‘सरफरोश’ हा चित्रपट आमिरच्या करिअरमधील एक सर्वोत्तम चित्रपट आहे. यातील आमिरचा अभिनय सर्वांनाच भावला होता. जॉन मॅथ्यू मट्टन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.