सुपरस्टार रजनीकांत जाहिरात का करत नाहीत?, कारण वाचून वाटेल तुम्हाला अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 02:37 PM2021-04-01T14:37:32+5:302021-04-01T14:37:47+5:30

सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला आहे.

Why Rajinikanth can, but won’t endorse brands | सुपरस्टार रजनीकांत जाहिरात का करत नाहीत?, कारण वाचून वाटेल तुम्हाला अभिमान

सुपरस्टार रजनीकांत जाहिरात का करत नाहीत?, कारण वाचून वाटेल तुम्हाला अभिमान

googlenewsNext

सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरूवारी याबाबतची घोषणा केली. अभिनय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांची चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे तुम्हाला सांगायला नको. आपल्या आवडत्या हिरोची पडद्यावरील एक एंट्री पाहण्यासाठीही येथील चाहते तुफान गर्दी करतात. तर, काही चाहते रजनीकांत यांना चक्क देव मानतात. आपल्या चाहत्यांचा आदरही रजनीकांत तितकाच करतात हे आपल्याला पहायला मिळते. कारण, रजनीकांत यांनी आजपर्यंत कुठल्याही मोठ्या ब्रँडची जाहिरात न स्विकारण्याचे कारणही त्यांचे चाहतेच आहेत. 


बॉलिवूडमधील बरेच कलाकार कुठल्यातरी कंपनीचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. मात्र, रजनीकांत कधीही जाहिरातींमध्ये काम करताना दिसले नाहीत. रजनीकांत यांनी करोडो रुपयांच्या जाहिरातींच्या ऑफर नाकारल्या आहेत. रजनीकांत यांना अनेक जगप्रसिद्ध ब्रँडने विचारणा केलेली पण त्यांनी सर्वाना नकार दिला. भारतात कोला कंपनीने तर करोडोंची ऑफर रजनीकांत याना देऊ केली होती. पण, त्यांनी कोलाच्या प्रतिनिधीला भेटायचे नाकारले होते. 


रजनीकांत यांच्या मते त्यांचे चाहते त्यांना देवासारखे मानतात, त्यांचे अनुकरण करतात. रजनीकांत पैसे घेऊन एखाद्या वस्तूची जाहिरात करतील तर त्यांचे चाहते त्यांचे अनुकरण करून त्या वस्तू विकत घेतील. हा धोका असल्याचे रजनीकांत यांना वाटते. तसेच देवाने कोक किंवा इतर पदार्थ विकले तर ते कसे वाटेल. रजनीच्या चाहत्यांना हे आवडणारे नाही, असा विचार रजनीकांत करतात. त्यामुळेच रजनी यांनी आपल्या कारकिर्दीत जाहिरातींद्वारे पैसे कमावण्यास नकार दिला आहे. 

Web Title: Why Rajinikanth can, but won’t endorse brands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.