​कपिल शर्मा करणार लवकरच लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 08:04 AM2017-10-31T08:04:36+5:302017-10-31T13:34:36+5:30

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांना खूप आवडायचा. पण कपिलची तब्येत खराब असल्याने या कार्यक्रमाने काही महिन्यांपूर्वी ...

Will Kapil soon get married? | ​कपिल शर्मा करणार लवकरच लग्न?

​कपिल शर्मा करणार लवकरच लग्न?

googlenewsNext
िल शर्माचा द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांना खूप आवडायचा. पण कपिलची तब्येत खराब असल्याने या कार्यक्रमाने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेण्यापूर्वी सुनील ग्रोव्हर आणि अली असगर यांनी या मालिकेला रामराम ठोकला होता. यांनी हा कार्यक्रम सोडल्यानंतर या कार्यक्रमाचा टीआरपी दिवसेंदिवस ढासळत गेला. या कार्यक्रमात कपिलने अनेक बदल केले. पण काही केल्या या कार्यक्रमाचा टीआरपी सुधारत नव्हता आणि त्यातही कपिलची तब्येत खराब असल्याने कार्यक्रमाचे चित्रीकरणाच्या तारखा सतत बदलाव्या लागत होता. त्यामुळे सोनी वाहिनीने या मालिकेला काही महिन्याचा ब्रेक दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिलची तब्येत बरी नाहीये हे खरे असले तरी तो मानसिक दृष्ट्या देखील खचत चालला असल्याचे म्हटले जात होते. तो डिप्रेशन मध्ये असल्याने त्याचे त्याची प्रेयसी गिन्नीसोबत ब्रेकअप झाले असल्याची देखील चर्चा होती. पण कपिल आणि गिन्नी यांचे ब्रेकअप झाले नसून कपिलच्या वाईट काळात ती त्याच्या सोबत आहे. 
कपिल लवकरच प्रेक्षकांना फिरंगी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कपिलने याआधी देखील किस किस को प्यार करू या चित्रपटात काम केले होते. पण या चित्रपटाला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फिरंगी हा चित्रपट त्याच्या करियरसाठी खूप महत्त्वाचा आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी कपिल सोडत नाहीये. फिरंगी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करावी यासाठी कपिल आणि त्याच्या कुटुंबीयांनी नुकतेच शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे त्यावेळी त्याची प्रेयसी गिन्नी देखील त्याच्यासोबत होती. 
गिन्नी आणि कपिल गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. कपिलने त्याच्या नात्याविषयी स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितले होते. कपिलने कधीच त्याचे नाते मीडियापासून लपवलेले नाहीये. गिन्नी त्यांच्या कुटुंबियांसमवेत शिर्डीला गेली असल्यामुळे कपिल आणि गिन्नी लवकरच लग्न करणार का अशा चर्चांना चांगलेच ऊत आले आहे.  

Also Read : ​कपिल शर्माने ऐकवला सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणाचा वेगळाच किस्सा; म्हणे, भांडण झालेच नाही!

Web Title: Will Kapil soon get married?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.