आता आई-बहिणीची भूमिका साकारणार; देशात पॉर्न इंडस्ट्री बनू नये, पूनम पांडे स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 07:56 PM2022-02-04T19:56:41+5:302022-02-04T20:02:51+5:30

सोशल मीडियावरील फॉलोअर्स संख्या वाढवण्यासाठी मी बोल्ड इमेज अपलोड करते आणि त्यात काही गैर नाही.

Will now play the role of mother-sister; The country should not have a porn industry, Poonam Pandey said clearly | आता आई-बहिणीची भूमिका साकारणार; देशात पॉर्न इंडस्ट्री बनू नये, पूनम पांडे स्पष्टच बोलली

आता आई-बहिणीची भूमिका साकारणार; देशात पॉर्न इंडस्ट्री बनू नये, पूनम पांडे स्पष्टच बोलली

googlenewsNext

मुंबई – मनोरंजन क्षेत्रातील बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे तिच्या ग्लॅमरस इमेजसाठी प्रसिद्ध आहे. परंतु आता ती मालिकांमधील भूमिकेसाठी शोध घेत आहे. सिनेमा अथवा मालिकांमध्ये आई-बहिणीची भूमिका साकारण्याची तिची इच्छा असून या माध्यमातून अभिनयाचं कौशल्य चाहत्यांना दाखवायचं आहे असं पूनम पांडे म्हणाली. एका चॅनेलच्या मुलाखतीत पूनमनं तिची इमेज, सोशल मीडिया पोस्ट आणि पॉर्न इंडस्ट्रीवर दिलखुलास भाष्य केले.

पूनम म्हणाली की, सोशल मीडियावरील फॉलोअर्स संख्या वाढवण्यासाठी मी बोल्ड इमेज अपलोड करते आणि त्यात काही गैर नाही. मी जाणुनबुजून असे फोटो पाठवते. मी अशीच आहे. जर तुम्ही मला बोल्ड म्हणत असाल तर तो माझ्यासाठी खूप सुंदर शब्द आहे. कदाचित आपल्या समाजाची मानसिकता वेगळी असेल परंतु मी ज्या लोकांना भेटते ते वेगळे आहेत. महिला माझ्याकडे येतात अन् सांगतात माझ्या पतीला तुम्ही खूप आवडतात. अनेक कपल माझ्यासोबत फोटो काढतात. हे माझ्या चाहत्यांचे प्रेम आहे. आता लोकांना यात काही गैर वाटत नाही असं तिने म्हटलं.

तसेच मी फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे सगळं केले. मी कधी फॉलोअर्स खरेदी केले नाहीत. मी हे कमावलेले फॉलोअर्स आहेत. मी हे का करायचं नाही. लोकं काय कमेंट्स करतात त्याची पर्वा करत नाही. अनेक लोकांचं म्हणणं आहे की, मी पॉर्न इंडस्ट्रीचा भाग आहे. परंतु पॉर्न आणि इरॉटिका यात खूप अंतर आहे हे त्यांना कळत नाही. मी स्वत: पॉर्न इंडस्ट्रीच्या विरोधात आहे. आपला देश पॉर्न इंडस्ट्री बनावं असं मला वाटत नाही. आपल्या संस्कृतीच्या ते विरोधात आहे. मी इरॉटिका करते. पॉर्न यात आणू नये. मी बोल्डनेसची चर्चा करते. ते खूप सुंदर आहे पॉर्न नाही असंही पूनम पांडे म्हणाली.

दरम्यान, मी इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर डॉल म्हणून ओळखली जाते. परंतु पुढील काळात मला मालिकांमध्ये भूमिका करायच्या आहेत. मी इन्टेंस भूमिका करते. मला सिनेमात आई, बहिणीची भूमिका स्वीकारायची आहे. संधी मिळताच मी ते आवश्य करेन असंही पूनम पांडे म्हणाली.

Web Title: Will now play the role of mother-sister; The country should not have a porn industry, Poonam Pandey said clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.