‘दगडी चाळ’चा सीक्वल येणार?

By Admin | Published: November 19, 2015 04:41 AM2015-11-19T04:41:15+5:302015-11-19T04:41:15+5:30

उत्कृष्ट दिग्दर्शन... खिळवून ठेवणारी संहिता..., संगीताची सुरेल गुंफण..., कलाकारांचा जबरदस्त अभिनय या वैशिष्टांमुळे ‘दगडी चाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने

Will the sequel of 'Dabdi Chal' come? | ‘दगडी चाळ’चा सीक्वल येणार?

‘दगडी चाळ’चा सीक्वल येणार?

googlenewsNext

उत्कृष्ट दिग्दर्शन... खिळवून ठेवणारी संहिता..., संगीताची सुरेल गुंफण..., कलाकारांचा जबरदस्त अभिनय या वैशिष्टांमुळे ‘दगडी चाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने निर्मात्या संगीता अहिर या चित्रपटाचा सीक्वल करण्याच्या योजना आखत असल्याचे समजते. हा सीक्वल देशभरातील रसिकांनीच नव्हे, तर दुबई, लंडन, सिंगापूर यासारख्या सातासमुद्रापार वसलेल्या महाराष्ट्रीयन लोकांनाही चित्रपट एन्जॉय करण्याची संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. सध्या स्क्रिपटवर काम सुरू असल्याचे कळते... चित्रपटाच्या ‘डॅडी’ मध्ये पुन्हा मकरंद देशपांडेच झळकळणार आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. २०१६ मध्ये चित्रपटगृहात ‘दगडी चाळ’ चा सीक्वल पहायला मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही!

Web Title: Will the sequel of 'Dabdi Chal' come?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.