सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार? म्हणाला- 'राज्यसभा आणि उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर आलेली...'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 06:34 PM2023-03-15T18:34:10+5:302023-03-15T18:34:30+5:30
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद कोरोना काळात लोकांना केलेल्या मदतीमुळे खूप चर्चेत आला होता.
Sonu Sood : सोनू सूद हा एक उत्तम अभिनेता तर आहेच, शिवाय तो खूप दयाळू माणूसही आहे. कोविड काळात सोनू सूदने गरजू लोकांना खूप मदत केली. हजारो लोकांना त्यांनी घरी पोहोचवले तर इतर मदतही त्याने केली. यामुळए सोनू सूदचे अनेकांनी कौतुक केले. विशेष म्हणजे, आजही त्याच्या घराबाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या असतात आणि तोही सढळ हाताने लोकांना मदत करतो. दरम्यान, सोनू सूदने राजकारणात प्रवेस करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
दोनदा राज्यसभेची ऑफर मिळाली
सोनू सूदचे समाजासाठी केलेले कार्य आणि त्याची लोकप्रियता पाहून तो राजकारणा प्रवेश करण्याची चर्चा होत राहते. यातच एएनआय वृत्तसंस्थेच्या पॉडकास्ट शोमध्ये सोनू सूदला राजकारणात जाण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर सोनूने मोठा खुलासा केला. 'मला दोन वेळा राज्यसभा खासदार होण्याची आणि एकदा उपमुख्यमंत्रिपदाचीही ऑफर आली होती, पण मी ती स्वीकारली नाही. मला इतर मोठमोठी पदेही ऑफर झाली, पण मला त्यात रस नाही,' असे सोनू म्हणाला.
या गोष्टी मला एक्साइट करत नाही
सोनू पुढे म्हणाला, 'मला अनेक गोष्टी ऑफर केल्या गेल्या आहेत, पण या गोष्टी मला एक्साइट करत नाहीत. मला माझे नियम स्वतः बनवायचे आहेत, मला इतरांच्या मार्गावर चालायचे नाही,' असंही सोनू म्हणाला. याशिवाय, 'सुरुवातीला छेदीसिंगची भूमिका आवडली नव्हती, त्यामुळे 'दबंग' सिनेमा नाकारला होता. पण, नंतर मी ती भूमिका केली,' असेही सोनूने यावेळी सांगितले.