'पुरुषांच्या बरोबरीने बायका...'; अरूंधतीची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 07:50 PM2022-02-05T19:50:34+5:302022-02-05T19:51:54+5:30

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

'Women are equal to men ...'; Arundhati's 'she' post on social media in discussion | 'पुरुषांच्या बरोबरीने बायका...'; अरूंधतीची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

'पुरुषांच्या बरोबरीने बायका...'; अरूंधतीची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

googlenewsNext

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्र घराघरात पोहचली आहे. या मालिकेत अरूंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.  

अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर पेट्रोल पंपवरील फोटो शेअर करत लिहिले की, पुरुषांच्या बरोबरीने बायका काम करताना दिसल्या की मला फार बरं वाटतं.स्त्रिया बाहेर पडून काम करू लागल्या, ह्या गोष्टीला अनेक वर्षे लोटली पण तरीही काही ठिकाणं अशी होती की तिथे पुरुषच काम करणार...जसं की पेट्रोलपंप...! अलिकडे बऱ्याच पेट्रोलपंपवर स्त्रिया काम करताना दिसतात , छान वाटतं. आज वंदनानी ऐटीत' "झिरो बघा" सांगत माझ्या गाडीत पेट्रोल टाकलं, माझ्या गाडीची चौकशी केली. आरतीनी मला कॉफी विचारली... इतकं मस्त वाटलं... ह्या बायका नं पेट्रोलपंपाला सुद्धा घराची ऊब आणतात.

मधुराणी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. यापूर्वी तिने अनेक गाजलेल्या मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. मधुराणीने या मालिकेपूर्वी 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही काम केले आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही ती झळकली आहे.

Web Title: 'Women are equal to men ...'; Arundhati's 'she' post on social media in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.