लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 03:36 PM2024-11-27T15:36:45+5:302024-11-27T15:38:25+5:30

'पुष्पा 2'मधील लोकप्रिय अभिनेत्याविरोधात एका महिलेने FIR दाखल केल्याची मोठी घटना समोर आलीय (pushpa 2)

Women files FIR against actor in Pushpa 2 sritej for exploitation in the name of marriage | लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

'पुष्पा 2' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाच्या रिलीजला अवघे काही दिवस बाकी असताना 'पुष्पा 2'च्या अभिनेत्याविरोधात एका महिलेने FIR नोंदवला आहे. 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या तेलुगू अभिनेता श्रीतेज विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेने हैदाराबाद येथील पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केलीय. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

श्रीतेज विरोधात FIR का नोंदवण्यात आला?

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार २५ नोव्हेंबर २०२४ ला कुकटपल्ली येथे एका महिलेने अभिनेता श्रीतेजविरोधात ही तक्रार नोंदवली आहे. श्रीतेजने महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिचं शारीरिक शोषण केलं याशिवाय तिच्याकडून २० लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आलाय. महिलेसोबत नात्यात असूनही श्रीतेजचं अर्चना नावाच्या एका महिलेसोबत रिलेशनशीप असून त्या दोघांना ७ वर्षांचा मुलगा होता, असा आरोपही पीडित महिलेने केलाय.

सुरुवातीला एप्रिलमध्ये या महिलेने तक्रार दाखल केली होती. नंतर अभिनेत्याच्या परिवाराने महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं होतं. परंंतु अभिनेत्याच्या कुटुंबाने काहीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे आता महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलीस तिने केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करणार करुन तिला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत. श्रीतेज याआधी अशाच वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकला होता. एका बँकेच्या मॅनेजरच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध ठेवल्याने श्रीतेज वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

Web Title: Women files FIR against actor in Pushpa 2 sritej for exploitation in the name of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.