स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:02 PM2024-09-30T12:02:32+5:302024-09-30T12:02:52+5:30

आयकुटवर तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तिच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

World Famous Reel Star kubraaykut Who Married Herself Ended Her Life; The note was found | स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली

स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली

तुर्कीची फेमस टिकटॉक स्टार कुबरा आयकुटने आत्महत्या केली आहे. गेल्या काही वर्षांपासून रिल स्टार आपले आयुष्य संपवत आहेत. आता आयकुटच्या आत्महत्येने सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत तिने आयुष्य संपविले आहे. 

आयकुटवर तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तिच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

इस्तंबुलच्या सुल्तानबेली जिल्ह्यात कुबराचा मृतदेह सापडल्याचे वृत्त तुर्कस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिस सर्व बाजुंनी तपास करत आहेत. 

कुबरा आयकुट ही अवघी २६ वर्षांची होती. तिने २०२३ मध्ये स्वत:शीच लग्न केले होते. योग्य वर मिळाला नसल्याचे कारण तिने दिले होते. या लग्नाचा व्हिडीओ देखील तिने पोस्ट केला होता. 

नैराश्याची शिकार...
टिकटॉक स्टार, रिल स्टार हे प्रसिद्धीमुळे नैराश्याचे शिकार बनत चालले आहेत. यातीलच आयकुट ही एक बनली आहे. एवढी प्रसिद्धी मिळूनही चिठ्ठीत तिने चांगल्या माणसासारखे जगण्यासाठी मला आयुष्यात काही मिळाले नाही, असे तिने म्हटले आहे. आयुष्यात स्वार्थी बना, यातच तुम्ही खूश रहाल. मी अनेक दिवसांपासून झगडत आहे. परंतू कोणीच माझ्याकडे लक्ष दिले नाही. मी स्वत:वरच प्रेम करते, म्हणून मी जात आहे. मी माझ्या मर्जीने उडी मारत आहे. मला आता आणखी जगायचे नाही. मी माझ्या आयुष्यात सर्वांसाठी चांगली होते. पण स्वत:साठी चांगली बनू शकली नाही, असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. 

Web Title: World Famous Reel Star kubraaykut Who Married Herself Ended Her Life; The note was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.