World No Tobacco Day: ...तेव्हा बिग बींनी सोडली सिगारेट

By Admin | Published: May 31, 2017 03:46 PM2017-05-31T15:46:08+5:302017-05-31T16:11:37+5:30

आजच्या वर्ल्ड नो तंबाकू डेच्या दिवशी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून सिगारेट न पिण्याचा सल्ला दिला आहे.

World No Tobacco Day: ... when cigarettes left by Big B | World No Tobacco Day: ...तेव्हा बिग बींनी सोडली सिगारेट

World No Tobacco Day: ...तेव्हा बिग बींनी सोडली सिगारेट

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, ता. 31- आज वर्ल्ड नो तंबाकू डे आहे. धुम्रपान तब्येतीसाठी किती हानिकारक आहे याची उदाहरणं आपण बघतो आहे. रस्त्यांवर, सिनेमागृहात जाहिराती प्रसिद्ध करून धुम्रपान न करण्याचा सल्ला दिला जातो तसंच धुम्रपानाचे दुष्परिणाम दाखवले जातात. आजच्या वर्ल्ड नो तंबाकू डेच्या दिवशी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून सिगारेट न पिण्याचा सल्ला दिला आहे. 
"तंबाकू तुमच्या विकासातील मोठा अडथळा आहे. मी 35 वर्षांपूर्वी सिगारटे पिणं बंद केलं आहे. तुम्ही बंद कराल का ?", असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. 
 
 
 
 
अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच इतर कलाकारांनीसुद्धा धुम्रपान सोडण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. क्रिकेटर विरेंद्र सहवागने कारचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. "या गाडीप्रमाणे तुम्ही तुमच्या शरिरातून धूर सोडू नका, तसंच तोंडाने प्रदुषण करू नका, असं ट्विट सहवागने केलं आहे. 
 
 
 
 
वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी वाळू शिल्पाच्या माध्यमातून नो स्मोकिंगचा संदेश दिला आहे. सुदर्शन पटनाईक त्यांच्या वाळू शिल्पाच्या माध्यमातून नेहमीच विविध संदेश देत असतात. 
 

Web Title: World No Tobacco Day: ... when cigarettes left by Big B

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.