'यारिया' फेम सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चढला बोहल्यावर, दिल्लीतील मंदिरात केलं थाटामाटात लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 09:54 AM2024-11-13T09:54:10+5:302024-11-13T09:54:56+5:30

बॉलिवूडमध्ये वेगळे सिनेमे करुन सर्वांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता हिमांश कोहलीने लग्न केलंय (himansh kohli)

yaariyan fame Bollywood actor of himansh kohli got married at delhi temple | 'यारिया' फेम सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चढला बोहल्यावर, दिल्लीतील मंदिरात केलं थाटामाटात लग्न

'यारिया' फेम सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चढला बोहल्यावर, दिल्लीतील मंदिरात केलं थाटामाटात लग्न

'यारिया' सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीने थाटामाटात लग्न केलंय. हिमांशने अलीकडेच लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अखेर काल हिमांशने होणाऱ्या पत्नीसोबत दिल्लीतील एका मंदिरात थाटामाटात लग्न केलं. हिमांशच्या लग्नाला त्याचे कुटुंबिय आणि मित्र-मैत्रीण उपस्थित होते. हिमांशच्या चाहत्यांनी आणि बॉलिवूडमधील कलाकारांनी हिमांशला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हिमांशचं लव्ह कम अरेंज मॅरेज

हिमांशने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केलेत. हिमांशचं लव्ह कम अरेंच मॅरेज असल्याचं समजतंय. हिमांशच्या पत्नी विनीचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. दिल्लीतील एका मंदिरात हिमांश लग्नाच्या बेडीत अडकला. हिमांशच्या लग्नाला त्याचे कुटुंबीय आणि फक्त जवळचे मित्र-मैत्रीण उपस्थित होते. मंगळवारी १२ डिसेंबरला हिमांशने लग्न केलं. तुषार कपूर आणि इतर कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हिमांशला शुभेच्छा दिल्या आहेत.


 


हिमांशचे हे सिनेमे गाजले

 हिमांशने गुलाबी रंगाची शेरवानी आणि त्याला साजेसा फेटा लग्नात परिधान केला होता. तर त्याची पत्नी विनीने गोल्डन आणि लाल रंगाची साडी परिधान केली होती. हिमांशने 'यारिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुढे 'जीना इसी का नाम है', 'बुंदी रायता', 'गहवारा', 'स्वीटी वेड्स NRI' अशा सिनेमांमधून हिमांशने त्याच्या अभिनयाची चुणुक दाखवली. 

Web Title: yaariyan fame Bollywood actor of himansh kohli got married at delhi temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.