'आर्टिकल ३७०' सिनेमाने अवघ्या ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी, वैभव तत्ववादी थक्क होऊन म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 02:45 PM2024-02-28T14:45:50+5:302024-02-28T14:49:47+5:30

Article 370 Movie: सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून वैभव तत्ववादीही थक्क झाला आहे. त्याने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

yami gautam article 370 movie earned 44cr in just 6 days vaibhav tatwawadi shared post | 'आर्टिकल ३७०' सिनेमाने अवघ्या ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी, वैभव तत्ववादी थक्क होऊन म्हणाला...

'आर्टिकल ३७०' सिनेमाने अवघ्या ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी, वैभव तत्ववादी थक्क होऊन म्हणाला...

यामी गौतम मुख्य भूमिकेत असलेला 'आर्टिकल ३७०' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. काश्मीरमधून आर्टिकल ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा या सिनेमातून मागोवा घेण्यात आला आहे. याचा इतिहास मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न 'आर्टिकल ३७०' सिनेमातून करण्यात आला आहे. 'आर्टिकल ३७०' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. 

'आर्टिकल ३७०' सिनेमात मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादीदेखील झळकला आहे. वैभवने या सिनेमात आर्मी ऑफिसर यश चौहान ही भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. २३ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर तब्बल ४४.६० कोटींची कमाई केली आहे. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून वैभव तत्ववादीही थक्क झाला आहे. त्याने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. "तुमचे मनापासून आभार", असं वैभवने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या पोस्टवर प्रार्थना बेहेरेने कमेंट करत अभिनंदन केलं आहे. 

'आर्टिकल ३७०' सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केलं आहे. तर आदित्य थार आणि लोकेश थार यांनी निर्मिती केली आहे. यामी आणि वैवभबरोबर या सिनेमात प्रिया मणि, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल यांच्या मुख्य भूमिका आहेत. अरुण गोविल या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहेत. 

Web Title: yami gautam article 370 movie earned 44cr in just 6 days vaibhav tatwawadi shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.