शिवभक्तीत तल्लीन यामी गौतम; पती आदित्यसमवेत अध्यात्मिक यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 07:46 PM2023-04-07T19:46:33+5:302023-04-07T20:00:08+5:30
यामीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या आणि कमी कालावधीच स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री यामी गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे, यामीही आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सक्रीय असते. यामी आणि तिचे पती आदित्य धर यांची जोडीही चाहत्यांना कमालीची आवडते. नुकतेच या जोडीने महादेवाची पूजा-आरती केली असून यामी आणि आदित्य यांचे अध्यात्मिक लूकमधील फोटो आता समोर आले आहेत. देवाधी देव महादेव यांच्या भक्तीत दोघेही तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे.
यामीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत यामी ही पती आदित्य यांच्यासमवेत कपाळी चंदन-उटी लावून महादेवासमोर हात जोडून दर्शन घेताना दिसून येते. यामीने हिमाचलमधील शिव मंदिरांचे दर्शन घेतले आहे. येथील पूजा-आरती करतानाचे सुंदर फोटो यामीने शेअर केले आहेत. मला जे काही यश आणि प्रेम मिळतंय, ते सर्व माझी माता दुर्गा राणी आणि भगवान शिवजी यांच्या आशीर्वादामुळेच. मी स्वत:ला धन्यता मानते. प्रेम, आभार आणि सर्वांचे धन्यवाद, असे कॅप्शन यामीने या फोटोसह दिले आहे.
यामी आणि आदित्य हे मंदिरात पुजाऱ्यांसमवेत पूजा-विधी करताना दिसत आहेत. महादेवांची पूजा केल्यानंतर, ज्वाला देवी मंदिरात जाऊनही दोघांनी दर्शन घेतले. यामीने डार्क गुलाबी रंगाचा वेलवेट सूट परिधान केलाय, तर लाल रंगाची ओढणीही आहे. कपाळी चंदन-उटीचा गंध लावल्याने यामी आणखी सुंदर व अध्याम लूकमध्ये दिसत आहे.