“ये अब कभी उठ नहीं पाएगा;” कंगनाचा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा, केला एकेरी उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 03:33 PM2023-02-18T15:33:18+5:302023-02-18T15:33:42+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, यानंतर बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिनं अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.“दुष्कृत्य केल्यानंतर देवतांचे राजे इंद्रदेखील स्वर्गातून खाली पडतात. मग तो तर केवळ एक नेता आहे. त्यानं अन्यायानं माझं घर तोडलं, तेव्हाच समजलं होतं की हाही लवकरच पडणार. चांगलं काम करुन देवता परत वर जाऊ शकतात. पण स्त्रीचा अपमान करणारे कधीच वर उठू शकत नाहीत. तो परत कधीच उठू शकणार नाही,” असा एकेरी उल्लेख करत कंगनानं उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.
कुकर्म करने से तो देवताओं के राजा इन्द्र भी स्वर्ग से गिर जाया करते हैं, वो तो सिर्फ़ एक नेता है, जब उसने अन्याय पूर्व मेरा घर तोड़ा था, मैं समझ गई थी, ये शीघ्र ही गिरेगा, देवता अच्छे कर्मों से उठ सकते हैं लेकिन स्त्री का अपमान करने वाले नीच मनुष्य नहीं… ये अब कभी उठ नहीं पाएगा।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 17, 2023
एकनाथ शिंदेंचाही निशाणा
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं असून, यापुढे तरी तुमच्यात सुधारणा घडू द्या, असा सल्ला दिला आहे. आम्ही ५० आमदार, १३ खासदार, शेकडो नगरसेवक व लाखो शिवसैनिक चोर आणि तुम्ही एकटे साव, असं विचारत कधी तरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणार की नाही, असा सवालही शिंदेंनी ठाकरेंना केला.
धनुष्यबाण सोडविला
उद्धव ठाकरेंनी २०१९ला हा धनुष्यबाण काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो आज आम्ही सोडविला आहे. आता त्यांचा सहानुभूती मिळण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नये, म्हणून केलेला हा प्रयत्न आहे, असंही शिंदे म्हणाले.