प्रेग्नंन्ट आहे दिव्यांका त्रिपाठी, ३९व्या वर्षी होणार आई! दिवाळी पार्टीत फ्लॉन्ट केला बेबी बंप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:23 PM2024-10-30T12:23:08+5:302024-10-30T12:23:38+5:30

दिव्यांका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीकडे गुडन्यूज असून ती गरोदर आहे. दिव्यांकाचा दिवाळी पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे.

ye hai mohobattein fame divyanka tripathi pregnant actress flaunt baby bump in diwali party video | प्रेग्नंन्ट आहे दिव्यांका त्रिपाठी, ३९व्या वर्षी होणार आई! दिवाळी पार्टीत फ्लॉन्ट केला बेबी बंप

प्रेग्नंन्ट आहे दिव्यांका त्रिपाठी, ३९व्या वर्षी होणार आई! दिवाळी पार्टीत फ्लॉन्ट केला बेबी बंप

'ये हे मोहब्बते' या मालिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. दिव्यांका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीकडे गुडन्यूज असून ती गरोदर आहे. दिव्यांकाचा दिवाळी पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

दिव्यांकाने पती विवेक दाहियासोबत दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. या दिवाळी पार्टीतील तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिव्यांकाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. दिव्यांकाने दिवाळी पार्टीसाठी पंजाबी ड्रेसमध्ये हजेरी लावली होती. याचा व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत विवेक दिव्यांकाची काळजी घेताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तर काळजी घेणाऱ्या विवेकचं कौतुकही केलं आहे. 


दिव्यांकाने २०१६ साली विवेक दाहियाशी लग्न केलं होतं. लग्नानंतर आता ८ वर्षांनी दिव्यांका आई होणार आहे. ३९ व्या वर्षी अभिनेत्री तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. 

Web Title: ye hai mohobattein fame divyanka tripathi pregnant actress flaunt baby bump in diwali party video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.