यंदा झळकणार रिअॅलिस्टिक सिनेमे
By Admin | Published: March 21, 2016 01:57 AM2016-03-21T01:57:57+5:302016-03-21T02:10:27+5:30
बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा वास्तववादी चित्रपटांचा काळ परत आला आहे. या वर्षीच्या शेवटपर्यंत तब्बल 6 मोठे असे चित्रपट पडद्यावर झळकणार आहेत ज्यांची कथा वास्तविक आहे.
पडद्यावर अवतरणार वास्तव!
बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा वास्तववादी चित्रपटांचा काळ परत आला आहे. या वर्षीच्या शेवटपर्यंत तब्बल पाच मोठे असे चित्रपट पडद्यावर झळकणार आहेत ज्यांची कथा वास्तविक आहे. बॉलीवूडच्या भाषेत याला कॉन्टेन्ट जॉनरचे चित्रपट असे संबोधले जाते. प्रेक्षकांनाही असे सिनेमे पाहायला आवडतात. २०१६च्या सुरुवातीपासूनच वास्तववादी चित्रपटांचा ट्रेंड सुरू झाला आहे. ‘एयरलिफ्ट’, ‘नीरजा’, ‘अलीगढ़’ ही त्याचीच उदाहरणे आहेत. ‘एयरलिफ्ट’ आणि ‘नीरजा’ या चित्रपटांना दर्शकांच्या कौतुकाबरोबरच बॉक्स आॅफिसवरदेखील यश मिळाले. याच रांगेत आणखीही काही चित्रपट आहेत त्यांच्यावर एक नजर...
रंगून
‘रंगून’ हा द्वितीय विश्वयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित रोमांटिक चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज करीत आहेत. या चित्रपटात सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना राणावत आहे. विशाल भारद्वाजच्याच दिर्ग्दशनात बनलेल्या ‘ओमकारा’मध्ये लंंगडा त्यागीची आठवणीतली भूमिका सैफने साकारली होती.
दंगल
कुस्तीपटू महावीर सिंह फोगटच्या जीवनावर आधारित ‘दंगल’ चित्रपटात आमीर खान मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीतेश तिवारीने केले आहे. चित्रपटात आमीर आपल्या मुलीला कुस्ती शिकवितो. टीव्ही अभिनेत्री साक्षी तन्वरने यात आमीरच्या पत्नीचा रोल केला आहे.
सरबजीत
‘सरबजीत’ची कथा पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद सरबजीतच्या जीवनावर आधारित आहे. ज्याची जेलमध्येच हत्या क रण्यात आली होती. या चित्रपटात सरबजीतच्या रोलमध्ये रणदीप हुड्डा आहे आणि त्याच्या बहिणीची भूमिका ऐश्वर्या रॉय साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करीत आहेत, ज्यांनी अगोदर ‘मेरी कोम’चे दिग्दर्शन केले आहे.
अज़हर
क्रिकेटर अजहरुद्दीनच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. इमरानला आशा आहे की, या चित्रपटामुळे त्याचे लडखडणारे करिअर वाचू शकेल. चित्रपटाचे दिग्दर्शन टोनी डिसूजा करीत आहेत.
मोहनजो दारो
‘लगान’, ‘स्वदेस’ आणि ‘जोधा-अकबर’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक
आशुतोष गोवारीकर या वेळी सिंधू घाटी सभ्यतेच्या विषयावर ‘मोहनजो दारो’ चित्रपट बनवित आहेत. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी गोवारीकर यांनी इतिहासाचा मोठा अभ्यास केलाआहे.
एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी
या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत क्रिकेटर धोनीच्या मुख्य भूमिकेत आहे. याचे दिग्दर्शन नीरज पांडेने केले आहे. नीरज पांडेचे वैशिष्ट्यच आहे की, त्याने वेगळ्या पद्धतीचे चित्रपट बनविले आहेत. जसे ‘ए वेनस्डे’, ‘स्पेशल 26’ आणि ‘बेबी’. आता तो या चित्रपटाच्या बाबतीतही उत्साही आहे.