‘होय, मला आवडतो रणबीरच्या घरच्यांचा सहवास’; आलियाची कबुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 07:35 PM2019-04-28T19:35:50+5:302019-04-28T19:37:12+5:30

‘होय, रणबीर माझा आॅल टाइम फेव्हरेट असून त्याच्या कुटुंबियांचाही सहवास मला प्रचंड आवडतो.’ अर्थात आता तिच्या अशा बोलण्याचा अर्थ उघड आहे. नाही का?

'Yes, I like Ranbir's people; Alia's confession! | ‘होय, मला आवडतो रणबीरच्या घरच्यांचा सहवास’; आलियाची कबुली!

‘होय, मला आवडतो रणबीरच्या घरच्यांचा सहवास’; आलियाची कबुली!

googlenewsNext

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूर सध्या त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे बरेच चर्चेत आहेत. ते आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. अलिकडेच ते दोघे मुव्ही डेटवर गेल्याचेही समजतेय. आता मात्र आलियाने जाहीरपणे कबुलीच देऊन टाकली की, ‘होय, रणबीर माझा ऑल  टाइम फेव्हरेट असून त्याच्या कुटुंबियांचाही सहवास मला प्रचंड आवडतो.’ अर्थात आता तिच्या अशा बोलण्याचा अर्थ उघड आहे. नाही का?

डेक्कन क्रॉनिकलसोबत झालेल्या तिच्या नुकत्याच मुलाखतीत आलिया म्हणते,‘अजून लग्नाबद्दल कुठलाच विचार नाही. सध्या मी त्याच्या घरच्यांना, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. त्यांनी सगळयांनी माझ्यातील सकारात्मकता खूप वाढवली आहे. रणबीर हा माझा ऑल  टाइम फेव्हरेट असून तो कायम राहील.’

सुत्रांनुसार, रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर हे सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. अद्याप त्यांच्या आजाराविषयी ठोस कोणताच पुरावा हाती लागला नसून मध्यंतरी त्यांना कँन्सर झाल्याच्या बातम्या मिळत होत्या. त्यादरम्यान आलिया ऋषी कपूर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अधूनमधून जात होती. 

आलिया आणि रणबीर यांच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, ‘ब्रम्हास्त्र’ या आगामी चित्रपटात ते दोघे एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी हे करणार असून या चित्रपटात  अमिताभ बच्चन हे देखील दिसतील. सुरूवातीला हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता मात्र आता पुढील वर्षी रिलीज होणार असल्याचे संकेत आहेत.
 

Web Title: 'Yes, I like Ranbir's people; Alia's confession!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.