Video: खऱ्या आयुष्यात नलू मावशी आहे बोल्ड; Kajra Mohabbat Wala वर डान्स करुन जिंकली नेटकऱ्यांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 18:00 IST2021-10-27T18:00:00+5:302021-10-27T18:00:00+5:30
Dipti ketkar: मालिकेत गोंधलेला स्वभाव, विस्कटलेले केस अशा अवतारात वावरणारी दिप्ती खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

Video: खऱ्या आयुष्यात नलू मावशी आहे बोल्ड; Kajra Mohabbat Wala वर डान्स करुन जिंकली नेटकऱ्यांची मनं
'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi me nandayla) ही मालिका सध्या चांगल्याच रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. स्वीटूसमोर ओमचं सत्य आल्यामुळे तिच्या मनातील राग आता निवळला आहे. पण, पुन्हा एकदा तिच्या मनात ओमविषयीचं प्रेम जागृत झालं आहे. त्यामुळे स्वीटूच्या आईच्या म्हणजेच नलूच्या मनात पुन्हा आपल्या लेकीचा संसार मोडेल की काय ही भीती निर्माण झाली आहे. या मालिकेत नलूची भूमिका अभिनेत्री दिप्ती केतकर (dipti ketkar) साकारत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत गोंधलेला स्वभाव, विस्कटलेले केस अशा अवतारात वावरणारी दिप्ती खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. याचा प्रत्यय नुकताच झी मराठी अवॉर्ड २०२१' मध्ये आला.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिप्ती आणि प्रिया मराठे या दोघी 'कजरा महोब्बतवाला' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी दिप्तीने परिधान केलेले कपडे, मेकअप आणि तिचे एक्स्प्रेशन्स पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर प्रिया आणि दिप्तीच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत असून आतापर्यंत पाच हजारापेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे.