हार्दिकच्या Ex पत्नीचा हा हॉरर सिनेमा रात्री अजिबात पाहू नका! झोप उडेल अन् काळजाचा ठोका चुकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:03 PM2024-10-21T12:03:50+5:302024-10-21T12:04:24+5:30

'हा' बॉलिवूड सिनेमा रात्री बघू नका! क्षणोक्षणी उडेल काळजाचा थरकाप; हार्दिक पांड्याच्या Ex पत्नीची खास भूमिका

you like stree 2 than you also like lupt horror bollywood movie starring natasa stankovic | हार्दिकच्या Ex पत्नीचा हा हॉरर सिनेमा रात्री अजिबात पाहू नका! झोप उडेल अन् काळजाचा ठोका चुकेल

हार्दिकच्या Ex पत्नीचा हा हॉरर सिनेमा रात्री अजिबात पाहू नका! झोप उडेल अन् काळजाचा ठोका चुकेल

सध्या बॉलिवूडमध्ये एका भयपटाची चांगलीच चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे 'स्त्री २'. हा सिनेमा पाहून अनेकांना थिएटरमध्ये धडकी भरवणारा अनुभव मिळालाय. सरकटे,  स्त्री  अशा कॅरेक्टर्सनी लोकांना चांगलंच घाबरवलं. ज्यांना 'स्त्री २' आवडलाय त्यांना बॉलिवूडमधील अशाच एका सिनेमाबद्दल सांगणार आहे. हा सिनेमा 'स्त्री २' पेक्षाही खतरनाक आहे. या सिनेमाचं नाव आहे 'लुप्त'. सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा बघून क्षणोक्षणी तुमच्या काळजाचा थरकाप उडेल यात शंका नाही. 

'लुप्त' सिनेमाची कहाणी

'लुप्त' सिनेमाची कहाणी सत्य घटनेवर आधारीत आहे. एका कुटुंबाभोवती ही कहाणी फिरताना दिसते. 'लुप्त' सिनेमाच्या कथेत दिसतं की एक मोठा उद्योगपती आपल्या कुटुंबासोबत बाहेर फिरायचा प्लॅन करतो. कुटुंबाचा मस्ती आणि मजेचा प्लॅन असताना एका अज्ञात व्यक्तीच्या येण्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडतं. त्यानंतर अत्यंत विचित्र आणि काहीतरी वेगळ्याच घटना घडतात. या घटना पाहून आपली घाबरगुंडी उडते.


या हॉलिवूड सिनेमावर आधारीत 'लुप्त'

'लुप्त' हा सिनेमा हॉलिवूडमधील २००३ साली रिलीज झालेला 'डेड एंड' या सिनेमावर आधारीत आहे. 'लुप्त' जेव्हा रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद सिनेमाला मिळाला. परंतु जेव्हा 'लुप्त' ओटीटीवर रिलीज झाला तेव्हा मात्र लोकांनी सिनेमाला चांगलंच उचलून धरलं. सर्वांनी या सिनेमाचं कौतुक करुन पसंती दर्शवली. या सिनेमात जावेद जाफरी, विजय राज, मीनाक्षी दीक्षित, निक्की वालिया यांनी भूमिका साकारली. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याची माजी पत्नी नताशा स्टेनकोविकने सिनेमात आयटम सॉंगवर डान्स केला होता.

 

Web Title: you like stree 2 than you also like lupt horror bollywood movie starring natasa stankovic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.