'तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर 'फँड्री'च्या शालूने दिले भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 06:03 PM2021-04-01T18:03:58+5:302021-04-01T18:04:37+5:30

'फँड्री' सिनेमातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'You should only come home as a wife'; Shalu of 'Fandry' replied to the fan's comment | 'तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर 'फँड्री'च्या शालूने दिले भन्नाट उत्तर

'तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर 'फँड्री'च्या शालूने दिले भन्नाट उत्तर

googlenewsNext

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' सिनेमातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राजेश्वरी खूप सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. मात्र यातील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिला एका चाहत्याने थेट लग्नाची मागणी घातली आहे. चाहत्याच्या या मागणीवर राजेश्वरीने भन्नाट उत्तर दिले आहे. राजेश्वरीच्या या उत्तरामुळे तिची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. राजेश्वरीने फेसबूकवर फोटो पोस्ट केला आहे. 


राजेश्वरी खरातच्या फोटोवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून घरी आली पहिजे. चाहत्यांच्या या कमेंटवर राजेश्वरी म्हणाली, ‘आणि माझ्या आयुष्याचे काय’ राजेश्वरीची ही कमेंट सध्या खूप व्हायरल होत आहे. राजेश्वरी बद्दल सांगायचे झाले तर, ती कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. 


राजेश्वरी नेहमी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो किंवा व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसतो.


शालू साकारणारी राजेश्वरी खरात हिला नागराज यांनी पहिल्यांदा पुण्यात पाहिले होते. फॅन्ड्रीसाठी तिचा एकच चेहरा नागराज यांच्या डोळ्यांपुढे येत होता. पण तिचा शोध लागेना. अनेक प्रयत्नानंतर तिचा शोध लागला. पण पोरीला चित्रपटात काम करू देण्यास तिचे आईवडील तयार होईनात. नागराज यांनी बरीच समजूत काढल्यानंतर राजेश्वरीच्या आईवडिलांनी परवानगी दिली आणि राजेश्वरी कॅमेऱ्यापुढे उभी झाली.

फॅन्ड्रीनंतर राजेश्वरीचा ‘अ‍ॅटमगिरी’ हा सिनेमा आला होता.

Web Title: 'You should only come home as a wife'; Shalu of 'Fandry' replied to the fan's comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.