करिश्मा कपूरला पोटगीच्या रुपात मिळते इतकी रक्कम, वाचून विस्फरतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 17:00 IST2021-11-04T16:59:54+5:302021-11-04T17:00:15+5:30
संजय कपूरकडून करिश्माला मिळणारी पोटगीची रक्कमही भलीमोठी आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण करिश्मा आणि संजयचा घटस्फोट सर्वात महागड्या घटस्फोटापैकी एक आहे.

करिश्मा कपूरला पोटगीच्या रुपात मिळते इतकी रक्कम, वाचून विस्फरतील डोळे
कितने अजीब रिश्ते हैं यहाँ…. या गाण्याच्या ओळी बॉलीवुडसाठी अगदी चपखल बसतात. कारण इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात. अशाच नात्यापैकी एक करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचही नातं आहे.
करिश्मा नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सिनेमापासून दूर असली तरी करिश्मा चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती सक्रीय असते. आजही करिश्माची जादू काही कमी झालेली नाही. पूर्वीप्रमाणेच चाहते आजही करिश्माच्या सौंदर्यावर फिदा होतात. तिच्यावर पूर्वीइतकंच भरभरुन प्रेम करतात. करिश्मा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दिल्लीचा व्यावसायिक संजय कपूरसह लग्नगाठ बांधल्यानंतर करिश्मा संसारात रमली. काही वर्ष दोघांचे वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरु होते. दोघांनी ११ वर्ष संसार केला. काही काळानंतर दोघांमध्येही काही ना काही कारणामुळे खटके उडायला सुरुवात झाली. करिश्माला दोन मुलंही आहेत. मात्र हळूहळू दोघांच्या नात्यात फुट पडायला सुरुवात झाली. शेवटी दोघेही घटस्फोट घेत वेगळे झाले. करिश्मा कपूर आता मुबंईत स्थायिक झाली आहे. सिनेमापासून दूर असली तरी करिश्मा कपूर अतिशय आलिशान असे आयुष्य जगते.
संजय कपूरकडून करिश्माला मिळणारी पोटगीची रक्कमही भलीमोठी आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण करिश्मा आणि संजयचा घटस्फोट सर्वात महागड्या घटस्फोटापैकी एक आहे. संजय कपूर दर महिन्याला करिश्माला पोटगीच्या रुपात १० लाख रुपये देतो. इतकंच काय तर मुलांना काही कमी पडू नये म्हणून खारमध्ये करिश्माला एक फ्लॅटही खरेदी करुन दिला आहे. घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी करिश्माला मिळाली असली तरी वर्षातून दोन महिने संजय कपूरला मुलांसोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे.