तरुणांनी एकत्रित बनविला ‘रिंगटोन’

By Admin | Published: August 24, 2015 12:08 AM2015-08-24T00:08:03+5:302015-08-24T00:08:03+5:30

मूळचा नांदेडचा असलेला अभिजित चव्हाण हा तरुण इंजिनिअरिंगसाठी पुण्यात आला; परंतु त्याची संगीत कलेची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून शिक्षण अर्धवट सोडून

Youngsters gathered 'ringtone' | तरुणांनी एकत्रित बनविला ‘रिंगटोन’

तरुणांनी एकत्रित बनविला ‘रिंगटोन’

googlenewsNext

मूळचा नांदेडचा असलेला अभिजित चव्हाण हा तरुण इंजिनिअरिंगसाठी पुण्यात आला; परंतु त्याची संगीत कलेची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून शिक्षण अर्धवट सोडून अशाच काही तरुणांना एकत्र घेऊन एआरए नावाची टीम तयार केली. या टीममध्ये कोणी आयटीमध्ये, तर कोणी विद्यार्थी तर कोणी घरी न कळविता आपली आवड एआरएमार्फत पूर्ण करून आनंद मिळवीत आहे.
प्रशांत श्रीवास्तव, रोहित मोरे, आकाश नद्रेकर, ओशो आठवले, अंकिता मानधने, हर्षा चौधरी असे काही तरुण संगीत, गीत लेखन, गायन, पटकथा
लिहिणे हे सर्व मटेरिअल व तगडी टीम आहे. म्हणून अभिजितच्या पुढाकाराने म्युझिक कलेसाठी करावा लागणारा स्ट्रगल यावर आधारित या टीमने रिंगटोन हा मराठी चित्रपट तयार केला असून, तो फेब्रुवारी २०१६मध्ये रिलीज होणार आहे.
तरुण मुलगा, त्याला कुटुंबाचा पाठिंबा नसतानाही म्युझिक कलेसाठी करावी लागणारी धडपड, तो कोणत्याही कवर वर्कचा आधार न घेता स्वत: तयार केलेले गाणे सोशल साइटवर टाकणे आणि त्याच गाण्याच्या प्रेमात पडणारी तरुणी अशा प्रकारचा चित्रपट असून, त्यामध्ये त्या तरुणाला आपली आवड जपण्यासाठी आलेल्या सामाजिक समस्या, बालवयात होणारे अत्याचार, काही गैरव्यवहार, नाती सांभाळत हा तरुण कसा यशस्वी होतो, असा हा चित्रपट ‘रिंगटोन’.

Web Title: Youngsters gathered 'ringtone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.