'चहल भाऊ, वहिनी...'; धनश्री पार्टीतून बाहेर पडली अन् तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:42 AM2023-01-30T10:42:21+5:302023-01-30T10:51:08+5:30

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा वर्माचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Yuzvendra Chahal's wife Dhanashree Verma's video is currently going viral on social media. | 'चहल भाऊ, वहिनी...'; धनश्री पार्टीतून बाहेर पडली अन् तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

'चहल भाऊ, वहिनी...'; धनश्री पार्टीतून बाहेर पडली अन् तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

googlenewsNext

टीम इंडियाचा आघाडीचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. धनश्री तिचे डान्सचे व्हिडीओ तसेच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र याचदरम्यान धनश्रीचा एका पार्टीमधून बाहेर पडल्यानंतरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

'इन्स्टंट बॉलिवूड' या इन्स्टाग्राम पेजवरुन धनश्रीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पार्टीसाठी धनश्रीने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. केस मोकळे सोडत धनश्रीने ग्लॅमरस लूक केला होता. परंतु, धनश्रीच्या या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत चहल भाऊ धनश्री नशेत असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

२५ वर्षांची धनश्री कोरियोग्राफर आहेत. तिचे अनेक डान्स व्हिडीओ व्हारयल होत असतात. तसेच युझवेंद्र चहलनेही तिच्यासोबत अनेक डान्स व्हिडीओ तयार केले आहेत. 

धनश्रीच्या अनेक व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळत असतात. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी डिसेंबर २०२० मध्ये विवाह केला होता. धनश्री आयपीएल सामन्यांदरम्यान नेहमीच हजेरी लावले. तसेच पती युझवेंद्र चहल याला पाठिंबा देत असते.

Web Title: Yuzvendra Chahal's wife Dhanashree Verma's video is currently going viral on social media.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.