टिआरपीच्या रेसमध्ये मिसेस मुख्यमंत्री पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 06:17 PM2019-09-13T18:17:25+5:302019-09-13T18:18:58+5:30

मिसेस मुख्यमंत्री ही मालिका आता टिआरपी रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात देखील हीच मालिका पाचव्या क्रमांकावर होती.

Zee Marathi's Tujhyat Jeev Rangala is on top as per barc india report | टिआरपीच्या रेसमध्ये मिसेस मुख्यमंत्री पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल

टिआरपीच्या रेसमध्ये मिसेस मुख्यमंत्री पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देया आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार तुझ्यात जीव रंगला ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. या रिपोर्टनुसार गेल्या काही आठवड्यांपासून तुझ्यात जीव रंगला ही मालिकाच पहिल्या स्थानावर आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद मिळते आहे. या मालिकेतील समर पाटील आणि खानावळीची मालकीण सुमी यांच्या मैत्रीने सगळ्यांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला आहे. ही मालिका आता टिआरपी रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात देखील हीच मालिका पाचव्या क्रमांकावर होती. 

या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार तुझ्यात जीव रंगला ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. या रिपोर्टनुसार गेल्या काही आठवड्यांपासून तुझ्यात जीव रंगला ही मालिकाच पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेत राणाची झालेली एक्झिट आणि त्यानंतर हार्दिक जोशीची राजा राजगोंडा म्हणून झालेली एंट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे असेच म्हणावे लागेल. कारण कथानकाला मिळालेल्या या ट्विस्टपासूनच या मालिकेची लोकप्रियता अधिक वाढली आहे. 

अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या रिपोर्टमध्ये पूर्वी माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर होती. पण तुझ्यात जीव रंगला या मालिकेने आता या मालिकेला चांगलेच मागे टाकले आहे. 

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, चौथ्या क्रमांकावर चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न असून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत. 

Web Title: Zee Marathi's Tujhyat Jeev Rangala is on top as per barc india report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.