झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२! चित्रपट आणि नाटक विभागात तब्बल १३५ नामांकने जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 04:20 PM2022-10-08T16:20:19+5:302022-10-08T16:39:24+5:30
यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२ साठी झी टॉकीजने तब्बल १३५ नामांकने जाहीर केली आहेत.
टेलिव्हिजन च्या इतिहासात विनोदाचा सन्मान करणारा झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड हा पहिला आणि एकमेव पुरस्कार सोहळा असून, यंदा झी टॉकीज ह्या सोहळ्याचे ८ वे पर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे . या वर्षी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ अतिशय मोठया स्तरावर, दणकेबाज कार्यक्रमांसोबत होणार आहे. यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२ साठी झी टॉकीजने तब्बल १३५ नामांकने जाहीर केली आहेत. ही नामांकाने चित्रपट आणि नाटकांसाठी एकूण २३ विभागांना देण्यात आली आहेत. झी टॉकीज टीमने नुकतीच झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ ची नामांकन यादी जाहीर केली. प्रत्येक श्रेणीमध्ये यंदा मजबूत स्पर्धा आहे. तसेच या वेळी पहिल्यांदाच प्रेक्षक पसंदी अवॉर्ड (व्यूव्हर्स चॉईस अवॉर्ड्स), म्हणजे ऑडियन्स वोट वर आधारित विभाग, नव्याने दाखल केले आहेत.झी टॉकीज ही प्रेक्षकांची लाडकी चित्रपट वाहिनी गेली १५ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे.
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट चित्रपट :
१) पांडू - निर्माते झी स्टुडिओ
२) डार्लिंग - निर्माते ७ हॉर्स एंटरटेनमेंट , वि पतके फिल्म्स , कथाकार मोशन पिकचर्स
३) टाईमपास ३ - निर्माते झी स्टुडिओ
४) दे धक्का २ - एव्हीके एंटरटेनमेंट , स्काय लाईन एंटरटेनमेंट
५) लोच्या झाला रे - मुंबई मूवी स्टुडिओस , आयडियास द एंटरटेनमेंट कंपनी
६) झोंबिवली - सारेगामा
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट दिग्दर्शक :
१) विजू माने - पांडू
२) समीर आशा पाटील - डार्लिंग
३) रवी जाधव - टाईमपास ३
४) महेश मांजरेकर , सुदेश मांजरेकर - दे धक्का २
५) परितोष पेंटर - लोच्या झाला रे
६) आदित्य सरपोतदार - झोंबिवली
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट लेखन :
१) विजू माने , कुशल बद्रिके , राजेश देशपांडे , समीर चौगुले - पांडू
२) प्रियदर्शन जाधव आणि रवी जाधव - टाईमपास ३
३) महेश मांजरेकर आणि गणेश मतकरी - दे धक्का २
४) परितोष पेंटर आणि प्रसाद खांडेकर - लोच्या झाला रे
५) समीर आशा पाटील - डार्लिंग
६) महेश अय्यर, साईनाथ गांवाद, सिद्धेश पुरकर, योगेश जोशी - झोंबिवली
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट अभिनेता :
१) भाऊ कदम - पांडू
२) प्रथमेश परब - टाईमपास ३
३) मकरंद अनासपुरे - दे धक्का २
४) अंकुश चौधरी - लक डाउन बी पॉसिटीव्ह
५) अमेय वाघ - झोंबिवली
६) प्रथमेश परब- डार्लिंग
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट अभिनेत्री :
१) सोनाली कुलकर्णी - पांडू
२) रितिका श्रोत्री - डार्लिंग
३) ऋता दुर्गुळे - टाईमपास ३
४) वैदेही परशुरामी - लोच्या झाला रे
५) सोनाली कुलकर्णी - दिल दिमाग और बत्ती
६) वैदेही परशुरामी -झोंबिवली
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता :
१) कुशल बद्रिके - पांडू
२) आनंद इंगळे - डार्लिंग
३) ह्रिषीकेश जोशी - भिरकीट
४) सिद्धार्थ जाधव - लोच्या झाला रे
५) सिद्धार्थ जाधव - दे धक्का २
६) संजय नार्वेकर - टाईमपास ३
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री :
१) अन्विता फलटणकर -टाईमपास ३
२) रेशम टिपणीस- लोच्या झाला रे
३) प्रिया बेर्डे - लकडाउन बी पॉसिटीव्ह
४) तृप्ती खामकर - झोंबिवली
५) वंदना गुप्ते - दिल दिमाग और बत्ती
६) वनिता खरात – लकडाउन बी पॉसिटीव्ह
नाटक नामांकनांवर एक नजर टाकूया .
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट नाटक :
१)हीच तर फॅमिली ची गंमत आहे - निर्माते गोपाल अलगेरी आणि सुनीता अहिरे
२) खरं खरं सांग - निर्माते बदाम राजा प्रोडक्शन
३) कुर्र्र - निर्माते प्र्ग्यास क्रिएशन मुंबई
४) आमने सामने - निर्माते नीना भागवत , संतोष काणेकर आणि महेश ओवे
५) हसता हा सावता -निर्माते मोरया थेटर्स
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट दिग्दर्शक ( नाटक ) :
१) नीरज शिरवाईकर -आमने सामने
२) प्रसाद खांडेकर - कुर्र
३) संतोष पवार - हीच तर फॅमिली ची गंमत आहे
४) संजय खापरे -डोन्ट वरी हो जायेगा
५) राजेश देशपांडे - धनंजय माने इथेच राहतात
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट संहिता ( नाटक ) :
१) नीरज शिरवाईकर -आमने सामने
२) अभिराम भडकमकर - हसता हा सावता
३) प्रसाद खांडेकर - कुर्र
४) संतोष पवार - हौस माझी पुरवा
५) शरमेश बेटकर - वाकडी तिकडी
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट अभिनेता ( नाटक ) :
१) आनंद इंगळे - खरं खरं सांग
२) सागर करांडे - हीच तर फॅमिली ची गंमत आहे
३) पॅडी कांबळे -कुर्र्र
४) प्रियदर्शन जाधव - हसता हा सावता
५) अंशुमन विचारे - वाकडी तिकडी
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट अभिनेत्री ( नाटक ) :
१) शलाका पवार - हीच तर फॅमिली ची गंमत आहे
२) विशाखा सुभेदार - कुर्र्र
३) नम्रता संभेराव - कुर्र्र
४) प्रिया बेर्डे - धनंजय माने इथेच राहतात
५) सुलेखा तळवलकर - खरं खरं सांग
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता ( नाटक ) :
१) संतोष पवार - सुंदरा मनामध्ये भरली
२) सूर्यकांत गोवळे - टेडे मेडे
३) अभिजीत केळकर - हौस माझी पुरवा
४) अमोल बावडेकर - हसता हा सावता
५) तेजस घाडीगावकर - वन्स मोअर तात्या
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री ( नाटक )
१) पूर्णिमा केंडे -अहिरे - सारखं काहीतरी होतंय
२) श्रद्धा पोखरणकर - हसता हा सावता
३) वरदा साळुंखे - दिल धक धक करे
४) रविना भायदे - लपवा छपवी
५) स्वानंदी बेर्डे - धनंजय माने इथेच राहतात