(Image Creadit : statyourself.com)
सध्या थंडी वाढत असून सगळेजण गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. पण एकीकडे भारतातील अनेक शहरांना वाढत्या वायू प्रदुषणाच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे. अनेक शहरांमध्ये लोक तोंडावर मास्क लावूनच घराबाहेर पडत आहेत. अनेक लोकांना श्वसनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहेत. श्वसनासंबंधातील समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापर करणं फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या उपायांबाबत...
वायु प्रदुषणामुळे सर्वात जास्त त्रास फुफ्फुसांना होतो. ज्यामुळे छातीत वेदना होतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काळी मिरी फार फायदेशीर ठरते. काळ्या मिरीची पूड मधासोबत घेतली तर फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण साफ होण्यास मदत होते. खोकला किंवा कफ झाला असेल तरीदेखील हा घरगुती उपाय फायदेशीर ठरतो.
प्रदुषणाच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. सकाळी उठल्या उठल्या ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. त्याचप्रमाणे ओव्याच्या झाडाच्या पानांचाही आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गुळ आणि मध उपयोगी ठरतं. वायू प्रदुषणामुळे होणाऱ्या आजारांशी लढण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम हे पदार्थ करतात.
आयुर्वेदामध्ये लसूण एक अॅन्टी-बायोटिक समजलं जातं. थंडीमध्ये लसणाच्या पाकळ्या भाजून खाणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते.
वायू प्रदूषणामुळे लोकांना सतत सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी आलं मदत करतं. एक चमचा मधामध्ये आल्याचा रस मिक्स करून एक पेस्ट तयार करा. जास्त त्रास होत असेल तर दिवसातून 2 ते 3 वेळा याचं सेवन करा.