- सारिका पूरकर-गुजराथीनवरात्रीचा उत्साह, धूम उत्तर भारतातही पाहायला मिळते. पंजाब, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागातही नवरात्रौत्सवात आदिशक्तीची उपासना केली जाते. देवीच्या नऊ रु पांची शास्त्रोक्त पूजा या भागातील भाविक करतात. नऊ दिवस देवीला विविध पदार्थांचा भोग अर्थातच नैवेद्य दाखवला जातो. साहजिकच त्या त्या प्रदेशात पिकवलेलं धान्य, फळं यांचा समावेश या प्रसादात केलेला असतो, हे आपण यापूर्वी काही भागातील पदार्थांवरु न जाणलं आहेच. तसेच उत्तर भारताचेही आहे. गहू, दूध यांचं भरपूर उत्पादन या राज्यांमध्ये होत असतं. म्हणूनच नैवेद्याच्या तसेच नवरात्रौत्वात केल्या जाणाºया पदार्थांमध्येही या मूळ घटक पदार्थांचा समावेश प्रामुख्यानं केलेला आढळतो. उत्तर भारतात देवीला विशेष करु न गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो.
1) कढा प्रसाद
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कणकेचा शिरा म्हणू या आपण याला. पंजाबमध्ये गुरु द्वारामध्ये हा कढा प्रसाद नेहमी केला जातो. तसेच नवरात्रीतही देवीला याचा नैवेद्य दाखवला जातो. साजूक तूपात गव्हाची कणकि खमंग भाजून घेऊन त्यात साखर आणि पाणी घालून जरा सैलसर शिरा तयार केला जातो. जोडीला भरपूर ड्राय फ्रूट्स घातले जातात. एक पौष्टिक पदार्थ म्हणून कणकेचा शिरा नेहमी खाल्ला जातो. पंजाबमध्ये गहू, दूध मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे पंजाबमध्ये तयार होणारे गोड पदार्थ हे सहसा साजूक तूपातच बनवले जातात. कणकेचा शिरा देखील साजूक तूपात बनवला तरच छान लागतो.
2) मालपुआउत्तर भारताची ओळख म्हणजे मालपुआ. सणावाराचा गोडाचा पदार्थ म्हणून मालपुआ प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मालपुआशिवाय उत्तर भारतात नवरात्रौत्सवाचा नेवैद्य, प्रसाद देखील अधुरा असतो. तर असा हा मालपुआ शाही गोडाचा पदार्थ म्हणूनही ओळखला जातो. मैदा, खवा, दही, वेलची पावडर, बडीशेप पूड घालून सैलसर मिश्रण तयार करु न सेट केलं जातं. नंतर घट्ट दूध आटवून त्याची रबडी बनवून घेतली जाते. मैद्याच्या मिश्रणात सोडा घालून साजूक तूपात मालपुआ तळून घेतले जातात. हे मालपुए साखरेच्या गरम एकतारी पाकात बुडवून काढून रबडीबरोबर खाल्ले जातात. भरपूर सुकामेवा मात्र यात हवा असतो. मैद्याऐवजी गव्हाची कणिक देखील मालपुआसाठी वापरली जाते.
3) गाजर फिरनी
उत्तर भारतात मुबलक प्रमाणात मिळणारा घटक पदार्थ म्हणजे गाजर.गाजराचा हलवा हा तर उत्तर भारताची खासियतच आहे. मात्र गाजर फिरनी हा देखील एक वेगळ्या चवीचा पदार्थ येथे नवरात्रौत्सवात नेहमी केला जातो. बासमती तांदूळ भिजवून तसेच गाजर सोलून उकडून त्याची पेस्ट बनवून घेतली जाते. नंतर दूध आटवत ठेवून त्यात ही एकित्रत पेस्ट तसेच साखर घालून पुन्हा दूध आटवलं जातं. नंतर जायफळ पावडर, केशर, सुकामेवा घालून मातीच्या छोट्या मडक्यांमध्ये गाजर फिरनीचा नैवेद्य दाखवला जातो.
4) पनीर खीर
उत्तर भारतातला आणखी एक शाही पदार्थ म्हणून ओळख असलेला पदार्थ म्हणजे पनीर खीर. नैवेद्याचा हा पदार्थ एरवी मेजवानीलाही केला जातो. घट्ट दूध आटवत ठेवून त्यास उकळी आली की किसलेले पनीर त्यात घालून दूध पुन्हा आटवलं जातं. चांगलं आटलं की त्यात साखर, वेलची पूड घालून दूध पुन्हा उकळलं जातं. नंतर बदाम-पिस्त्याचे भरपूर काप पेरले की शाही पनीर खीर तयार होते.
5) निमिश
हा मेजवानीचा पदार्थ म्हणजे लखनौच्या नवाबांचा हा अत्यंत आवडीचा पदार्थ. शाही पदार्थ अशीच त्याची ओळख आहे. घट्ट दूध उकळवून त्यात भरपूर फेटलेली साय घालून दूध उकळलं जातं. दूध गार झालं की त्यात गुलाबजल, केशर, भरपूर पिस्ते, पीठीसाखर घालून ते अगदी थंडगार करु न घेतलं जातं. मग हे निमिश चांदीचा वर्ख लावून नैवेद्यासाठी ठेवलं जातं.