सध्या जगभरामध्ये कॅन्सरसारखा भयंकर आजार आपले हात-पाय पसरत असून संपूर्ण जगासमोर कॅन्सर ही एक समस्या बनली आहे. अशातच बदलेली जीवनशैली आणि पर्यावरण कॅन्सरच्या समस्येमध्ये आणखी भर घालतात. कॅन्सर एक गंभीर समस्या असून त्यावर अद्याप कोणताही ठोस उपचार सापडलेला नाही. भारतासारख्या देशांमध्ये कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त असलेले अनेक लोक आहेत. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, कॅन्सरच्या आजाराची लक्षणं वेळीच लक्षात आली तर त्यावर उपचार करणं सहज शक्य होतं. परंतु, कॅन्सरची लक्षणं या आजाराने लगेच दिसून येत नाहीत. अशातच कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी माणसांनी जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. आम्ही येथे काही अशाच डाएट टिप्स सांगणार आहोत. ज्या कॅन्सरच्या आजारापासून बचाव करण्यासाठी मदत करतात.
लसूण आणि कांदा
अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, ज्या व्यक्ती आपल्या डाएटमध्ये लसूण आणि कांद्याचा समावेश करतात. त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता अनेक पटिंनी कमी होते. भारतामध्ये पदार्थ तयार करताना लसूण आणि कांद्याचा वापर करण्यात येतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून यांचा वापर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. लसूण आणि कांद्यामध्ये आढळून येणारी पोषक तत्व पचनसंस्था ठिक करण्यासाठी मदत करतात. मोठ्या आतड्यांचा कॅन्सर आणि प्रोटेस्ट कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर लसूण आणि कांद्याचा आहारामध्ये समावेश करा.
भाज्या
भाज्यांबाबत आपण नेहमी घरातील थोरामोठ्यांकडून ते अगदी डॉक्टर्सकडूनही ऐकत असतो. परंतु कोणकोणत्या भाज्या आपल्याला कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी मदत करतात याबाबच अनेकांना माहीत नसते. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, भारतामध्ये कोबी आणि ब्रोकलीची भाजी मुबलक प्रमाणात मिळत असून या भाज्यांचा डाएटमध्ये समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. या भाज्यांमध्ये कॅन्सर रोखण्यासाठी उपयुक्त असणारी तत्व आढळून येतात. याशिवाय ब्रोकली आणि कोबीमध्ये शरीर डिटॉक्सीफिकेशन करण्यासाठी मदत करणारी तत्व आढळून येतात. शरीरामध्ये विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी ब्रोकली आणि कोबीचं सेवन करणं फायदेशीर ठरत.
फळं
कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये फळांचा अवश्य समावेश करा. एका संशोधनानुसार, भारतामध्ये सहज उपलब्ध होणारं सिताफळ कॅन्सरवर परिणामकारक ठरतं.
सिताफळाव्यतिरिक्त गाजराचं सेवन करणंही अनेक आजारांसोबतच कॅन्सरवरही परिणामकारक ठरतं. गाजर आणि सिताफळामध्ये आढळून येणारं कॅरोटिन्स कॅन्सरची तत्व शरीरातून नष्ट करण्यासाठी मदत करतं.
टिप : प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही पदार्थांचे सेवन करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. वरील माहितीमधून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.