उन्हाळा सुरु झाला की, वेगवेगळे ज्यूस पिण्याचा लोक सपाटाच लावतात. हे योग्यही आहे. पण काही ज्यूस फारच हेल्दी असतात. संत्र्याच्या ज्यूस त्यापैकीच एक. संत्र्याच्या ज्यूसचे पुरुषांना अनेक फायदे होतात. अॅटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटमिन सी ने भरपूर असलेल्या संत्र्याच्या ज्यूसने पुरुषांमध्ये शुक्राणूंची क्वालिटी सुधारते. सोबतच एनर्जी मिळते. संत्र्याच्या ज्यूसमुळे त्यांची फर्टिलिटी सुधारते. हेच कारण आहे की, ज्या पुरुषांना बाळ न होण्याची तक्रार असते त्यांना संत्र्याचा ज्यूस सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
संत्र्यामध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, कोलिन, कॅल्शिअम, कॉपर आणि व्हिटॅमिन बी - १ भरपूर प्रमाणात असतात. इतके सर्व गुण असल्याने अर्थातच या ज्यूसमुळे वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. कमी कॅलरी आणि हाय फायबर रिच असल्याकारणाने वेट लॉससाठी फायदेशीर ठरतं. चला जाणून घेऊ ज्यूसचे फायदे...
१) इन्फर्टीलिटीमध्ये सुधारणा - ज्या पुरुषांचे शुक्राणू कमजोर होतात त्यांच्यासाठी संत्र्याचा ज्यूस फार फायदेशीर ठरतो. अॅटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन शुक्राणूंची क्वालिटी चांगली करतात. व्हिटॅमिन आणि फॉलिक अॅसिड सुद्धा शुक्राणूंची क्वालिटी चांगली करतात.
२) मेंदूसाठी - संत्र्यामध्ये असलेल्या फॉलिक अॅसिड किंवा फॉलेट व व्हिटॅमिन बी मेंदूच्या विकासाठी चांगलं असतं. पोषक तत्व असल्याकारणाने प्रेग्नेंट महिलांनी हे खावेत. याने गर्भात असलेल्या बाळाचा विकास चांगला असतो. सोबतच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याचा धोकाही वाढतो.
३) इम्यूनिटी वाढवा - संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट सुद्धा भरपूर प्रमाणात असतात आणि इम्यून सिस्टम चांगलं असतं. याने शरीराचं फ्री-रॅडिकल्सपासून रक्षण करतात.
४) अॅंटी-एजिंग - व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ने भरपूर असलेल्याने याचा सौंदर्य खुलवण्यासाठी फायदा होतो. अॅंटी एजिंग गुणांसोबतच यात डाग दूर करण्याचे गुणही आढळतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए चं सुद्धा प्रमाण भरपूर असतं त्यामुळे त्वचा हेल्दी राहते.
५) डोळे राहतात हेल्दी - संत्री डोळ्याच्या म्यूकस मेम्ब्रेन्सला हेल्दी करतात. याने मेक्यूलर डिजनरेशनपासून डोळ्यांचा बचाव होतो. मेक्यूलर डिजनरेशन डोळ्यांच्या दृष्टीशी संबंधित एक समस्या आहे.
संत्र्याचा ज्यूस पिण्यापेक्षा जास्त फायदेशीर नुसतं संत्री खाणं असतं. संत्र्याच्या ज्यूसमध्ये शुगरचं प्रमाण वाढतं. तर संत्री खाल्ल्याने फायबर कमी मिळतं. याने भूक कमी लागते.