- मयूर पठाडेया दिवसांत तुम्ही आंब्यावर चांगलाच ताव मारला असेल. नाही? फळांच्या या राजाकडे नुसतं पाहिलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण हा आंबा आपल्या आरोग्यासाठहीी किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहीत आहे?आंब्यात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे तो तुमचं नुसतं आरोग्यच चांगलं राखत नाही, तर अनेक विकारांपासून तुम्हाला मुक्तीही मिळवून देतो.बहुगुणी आंबा
१- मुलायम स्किनआंब्यामुळे आपली स्किनही तजेलदार होते, हे तुम्हाला सांगितलं तर? आंब्याच्या रसात ती जादू आहे.२- कॅन्सरवर नियंत्रणकॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा आंब्यापासून बचाव होऊ शकतो. आंब्यात भरपूर प्रमाणात असलेले अॅँटी आॅक्साइड, व्हिटॅमिन सी आणि फायबर्स या गोष्टी कॅन्सरच्या वाढीला पायबंद घालतात.३- विसराळूपणावर माततुम्हाला विसराळूपणाची सवय आहे? सारखं सारखं विसरता? लक्षात राहात नाही. आंब्याच्या सेवनानं तुमची ही समस्या दूर होऊ शकते. कारण आंब्यात असलेलं ग्लुटामिन तुमची स्मृती वाढविण्यासाठी उपयोगी ठरू शकतं.
४- भुकेवर आणि वजनावर कंट्रोलवाढत्या वजनाला आळा कसा घालायचा हा आजकाल सर्वांपुढेच मोठा प्रश्न असतो. पण आंब्यात असलेल्या लेप्टिनमुळे तुमची ही समस्या दूर होऊ शकते. कारण ते तुमच्या भुकेवर कंट्रोल ठेवतं आणि तुमची सारखी ‘खा खा’ होत नाही. याशिवाय आंब्याची कोयदेखील तुमच्या शरीरातील वाढत्या चरबीला रोखून धरते. ५- दृष्टीत सुधारआंब्यामध्ये अ जिवनसत्वाची मात्रा खूप मोठ्या प्रमाणावर असते. अ जिवनसत्व डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं. आंब्याच्या नियमित सेवनामुळे आपले डोळे चांगले राहाण्यास मदत होते. आपली दृष्टी तर त्यानं सुधारतेच, पण मोतीबिंदूसारख्या समस्यांपासूनही आपण दूर राहू शकतो.