(Image Source: EastMojo/ Facebook.)
चहाचे कितीही वेगवेगळे प्रकार आले तरी चहाचे नवे संशोधित प्रकार किंवा रेसिपी शोधणं काही थांबत नाही. वेगवेगळ्या चहाचे प्रकार सध्या बाजारात उपलब्ध असतानाही दररोज आणखी नवीन चहाचे प्रकार समोर येत असतात. आता असाच एक चहा बाजारात आला आहे. पण या चहाची किंमत तुम्हाला माहीत असलेल्या चहाच्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
तुम्हाला जर सांगितलं की, या नव्या चहा पावडरची किंमत २४, ५०१ रुपये प्रति किलो आहे. तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं....अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यात या चहाचं पिक घेतलं जातं. हा चहा दिसायला जांभळ्या रंगाचा आहे.
चहावर रिसर्च करणाऱ्या एका संस्थेने या चहाच्या इतिहासाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना माहिती मिळाली की, हा चहा आधी केनियामध्ये पिकवला जायचा. तेथून हा चहा आसाममध्ये आला आणि आसाममधून अरुणाचल प्रदेशात. हा चहा फार चांगल्या प्रतिचा मानला जातो.
तज्ज्ञांनुसार, हा चहा कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव करु शकतो. त्यासोबतच हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्याही हा चहा घेतल्याने दूर होतात. या चहाची आधीची किंमत ही १५००० रुपये प्रति किलो होती. पण गेल्या काही महिन्यात याची मागणी वाढल्याने याची किंमत वाढली आहे.