आपण जे काही खातो त्यामुळे आपण जिवंत राहतो. अन्नामुळे शरीराला पोषण मिळतं ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. मात्र, आजकालच्या फळ-भाज्यांमध्ये पोषक तत्व फार कमी असतात. प्रदूषण, केमिकल, फर्टिलायझर इत्यादीमुळे यांमध्ये घातक पदार्थ राहतात. ज्यासाठी टॉक्सिन असा शब्द वापरला जातो.
टॉक्सिन दोन प्रकारचे असतात. एक नॅचरल जे अन्न पचन झाल्यावर तयार होतात आणि दुसरं आर्टिफिशिअल, जे केमिकल, फर्टिलायझरमधून येतात. आयुर्वेदिक डॉक्टर तन्मय गोस्वामी यांनी सांगितलं की, आजकालच्या सगळ्यात मोठ्या आजार टॉक्सिन नावाचं विष आहे. हे विष प्रत्येक पदार्थ, भाज्या, फळांमध्ये असतं. नॉनव्हेजमध्ये ऑक्सीटॉसिन असू शकतं. त्यांनी सांगितलं की, तुमच्याद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीत टॉक्सिन असतं.
टॉक्सिन काढण्याची पद्धत
डॉ. तन्मय गोस्वामी यांच्यानुसार, टॉक्सिन नष्ट करण्यासाठी आयुर्वेदात एक पद्धत सांगण्यात आली आहे. तुम्ही गोष्टींचं जेवणासोबत सेवन करा. या गोष्टींमुळे शरीरात टॉक्सिन तयार होण्याचा धोका कमी होईल. सोबतच जे टॉक्सिन जमा आहेत, तेही बाहेर काढण्याचं काम करतील.
जेवणासोबत रोज काय खावं?
तूप
मध
लोणी
सूंठ
काळी मिरी
सैंधव मीठ
डॉक्टरांनी सांगितलं की, जर जेवणासोबत तुम्ही या गोष्टींचं सेवन रोज केलं तर शरीरातील सगळे टॉक्सिन बाहेर पडतील. जर तुम्ही एखाद्या आजारावर उपचार घेत असाल तर या गोष्टींमुळे उपचार आणखी प्रभावी होईल. कारण शरीरातील सगळे टॉक्सिन बाहेर निघाल्यावर औषध लगेच प्रभाव करेल.