थंडीमध्ये गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी खाणं फायदेशीर ठरतं. फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही ही भाकरी अत्यंत पौष्टीक असते. आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश केल्यामुळे हाडांशी निगडीत आजार दूर होण्यास मदत होते. तसेच वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. बाजरीच्या भाकरीमध्ये असणारं नियासिन नावाचं व्हिटॅमिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य राखण्यास मदत होते.
1. शरीरासाठी ऊर्जादायी
थंडीमध्ये बाजरीची भाकरी शरीराला एनर्जी मिळण्यासाठी मदत करते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. बाजरीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. तसेच बाजरीची भाकरी खाल्याने बराच वेळ पोट भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून दूर राहता आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
2. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी
हृदयासंबंधित आजारांनी त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी बाजरीची भाकरी फायदेशीर ठरते. बाजरीमधील पोषक तत्व कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो.
3. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी
बाजरीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असतं. जे तुमच्या शरीरासाठी उपयोगी ठरतं. हे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं.
4. पचनक्रिया सुधारण्यासाठी
पचनक्रिया सुधारण्यासाठी बाजरीची भाकरी फायदेशीर ठरते. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. जे बद्धकोष्ठाची समस्या दूर करण्यासाठी मदत करते.
5. डायबिटीज रूग्णांसाठी फायदेशीर
डायबिटीजच्या रूग्णांसाठी बाजरीची भाकरी मदत करते. डायबिटीजपासून बचाव करण्यासाठी तसेच कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही मदत करते.
अशी तयार करा पौष्टीक बाजरीची भाकरी :
साहित्य :
- बाजरीचं पीठ 2 कप
- कोमट पाणी
- तूप किंवा बटर भाकरीवर लावू शकता
कृती :
- सर्वप्रथम बाजरीची भाकरी तयार करण्यासाठी पीठ परातीमध्ये चाळून घ्या.
- पीठामध्ये थोडं कोमट पाणी मिक्स करून पीठ मळून घ्या.
- तुम्ही लगेच भाकरी करू शकता किंवा पीठ 15 मिनिटांसाठी ठेवून नंतर भाकरी थापू शकता.
- गरम गरम बाजरीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे.