चपाती हा सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ आहे. भारतीय संस्कृतीत चपाती हा पदार्थ आहारात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. रोज चपाती अनेक घरांमध्ये तयार केली जात असल्यामुळे शिळी चपाती असतेच. खास करून घरातील महिला या मोठ्या प्रमाणावर शिळे अन्न खात असतात. पण तुम्हाला माहित आहे का? ताजी चपाती खाण्यापेक्षा शिळी चपाती खाण्याचे फायदे अनेक आहेत. आज आम्ही तुम्हाला शिळी चपाती खाण्याचे फायदे सांगणार आहोत. शिळ्या चपातीत अनेक पोषक तत्वं असतात. एका रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की शिळी चपाती खाल्ल्यामुळे शरीराला प्रोटिन्स आणि अधिक उर्जा मिळते.
डायबिटिससाठी उपयुक्त
ज्या लोकांना डायबिटिसचा त्रास आहे अशा लोकांनी शिळ्या चपातीचे सेवन केलं तर शरीरासाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी सकाळी शिळी चपाती दुधात कुस्करून खाल्ल्यास नाष्त्यासाठी एक चांगला ऑप्शन असेल तसंच यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील.
रक्तदाबावर परिणाम
ब्लड प्रेशर व्यवस्थित राहण्यासाठी शिळ्या चपातीचं सेवन लाभदायक ठरेल. थंड दुधात शिळी चपाती खाल्यामुळे रक्तदाब सुरळित राहतो.
व्यायामासाठी फायदेशीर
जिमला जात असलेल्या लोकांनी शिळी चपाती खाल्ली तर फायदेशीर ठरते. अनेक फिटनेस सेंटमध्ये सकाळी शिळी चपाती खाण्याचे फायदे दिले जातात. यात असणारे बॅक्टिरीया शरीर चांगलं ठेवण्यासाठी लाभदायक ठरत असतात. नियमित शारीरिक कसरत किंवा व्यायाम भरपूर करतात. अश्या व्यक्तींसाठी शिळ्या चपातीचे सेवन हे शरीराला त्वरित उर्जा देणारे आहे.
एसिडिटीपासून सुटका
सध्याच्या काळात अनियमीत जीवशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकिच्या पद्धतींमुळे एसिडिटीची समस्या अनेकांना जाणवत असते. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी दुधासोबत शिळी चपाती खा. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळतो. तसंच अशक्तपणा जाणवत असेल तर शिळ्या चपातीच्या सेवनाने अशक्तपणा कमी होतो. ज्यांना गॅस आणि पचनाच्या समस्या आहेत. त्यांच्यासाठी शिळी चपाती हा खूप चांगला उपाय आहे. तसेच गव्हाच्या पोळीमध्ये असणारे फायबर अन्न पचनासाठी देखील फायदेशीर आहे. ( हे पण वाचा-जिमला जात असाल तर वेळीच व्हा सावध, असू शकतो 'या' गंभीर व्हायरसचा आणि इन्फेक्शनचा धोका!)