Curry Patta Benefits : भारतात रोजच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर भरपूर केला जातो. साऊथ इंडियन पदार्थ असो वा आणखी काही कढीपत्त्याशिवाय काम भागत नाही. याने पदार्थांची टेस्ट चांगली वाढते. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, याचे आरोग्याला किती फायदे होतात. एकदा जर तुम्ही याचे फायदे वाचले तर तुम्ही रोज कढीपत्त्याची पाने खाल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आरोग्याचा खजिना आहेत 'ही' पाने
कढीपत्त्यांमध्ये फॉस्फोरस, कॅल्शिअम, आयर्न, कॉपर, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअमसारखे न्यूट्रिएंट्स आढळतात. जे शरीराला वेगवेगळे फायदे देण्याचं काम करतात. अशात रोज सकाळी जर ही 3 ते 4 पाने खाल्ली तर तुम्हाला याचा काय फायदा होतो हे जाणून घेऊया.
1) डोळे चांगले राहतात
कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने नाइट ब्लाइंडनेस किंवा डोळ्यांशी संबंधित इतर आजारांचा धोकाही टाळला जाऊ शकतो. कारण यात डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटॅमिन ए असतं. याने डोळ्यांची दृष्टी अधिक वाढते.
2) डायबिटीसमध्ये फायदेशीर
डायबिटीसमध्ये अनेकदा रूग्णांना ही पाने चावण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात हाइपोग्लायसेमिक तत्व आढळतात. जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतात.
3) डायजेशन होतं चांगलं
ही पाने रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने डायजेशन चांगलं होतं. सोबतच बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, ब्लोटिंगसहीत पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात.
4) इंफेक्शनपासून बचाव
कढीपत्त्यामध्ये अॅंटीफंगल आणि अॅंटी-बायोटीक गुण आढळतात. ज्याने अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून बचाव होतो. याने अनेक आजारांचा धोका टाळला जातो.
5) वजन होईल कमी
ही पाने खाल्ल्याने वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. कारण यात एथिल एसीटेट महानिम्बाइन आणि डाइक्लोरोमेथेन सारखे तत्व आढळतात.
6) कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतं
कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. या पानांमधील अॅंटी-ऑक्सीडेंट कोलेस्ट्रॉलचं ऑक्सीकरण रोखण्यास मदत करतात.