फळं ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने फळं खाण्याचा सल्ला हा आवर्जून दिला जातो. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरी सारख्या बेरीज अनेकांना प्रचंड आवडतात. बेरीज मेटाबॉलिज्म बूस्ट करतात आणि फॅटी लिव्हरची समस्या दूर करतात. याचबरोबर डायजेस्टिव्ह सिस्टममधून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी देखील मदत करतात.
ब्लूबेरी खाणं हे वयोवृद्ध व्यक्तींसाठी अत्यंत चांगलं असतं असं म्हटलं जातं. मात्र ब्लूबेरी ही सर्व वयोगटातील मंडळींसाठी फायदेशीर ठरते. एका रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे. ब्लड प्रेशर आणि स्मरणशक्तीबाबत असलेल्या समस्या दूर करण्यासाठी ब्लूबेरी ही उपयुक्त असते. ब्लूबेरी संदर्भातील नवीन माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. 'द जर्नल ऑफ जेरन्टॉलजी, सिरीज अ: बायलॉजिकल सायन्सेज अॅन्ड मेडिकल सायन्सेज' मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात ब्लूबेरीचे फायदे सांगण्यात आले आहेत.
रिसर्चनुसार, रोज एक कप ब्लूबेरी खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. यामुळे ब्लड प्रेशरची समस्या दूर होते. रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होऊन त्यांचे कार्य सुधारते. तसेच ब्लूबेरीमुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतरित्या चालू राहते. ब्लूबेरीमध्ये पॉलीफेनॉल्स असल्याने स्मरणशक्ती चांगली राहते. रिसर्चमध्ये काही विसरभोळ्या लोकांना ब्लूबेरी खाण्यासाठी देण्यात आली होती. त्यांनी ती खाल्ल्यावर त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये काही चांगल्या सुधारणा झालेल्या दिसल्या.
ब्लूबेरी ही अनेक शारीरिक समस्यांवर फायदेशीर आहे. ब्लूबेरीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे रिसर्चमध्ये ब्लूबेरीला 'सुपर फ्रूट' असं नाव देण्यात आलं आहे. कोणत्याही फॉर्ममध्ये ब्लूबेरी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. फ्रोजन फॉर्म, फ्रेश किंवा हर्बल टी फॉर्ममध्ये देखील ब्लूबेरी खाऊ शकतो. त्यामुळेच रोज एक कप ब्लूबेरी खाणं फायदेशीर आहे. एका हिंदी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.
फळं खाण्याऐवजी फळांचे ज्यूस पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. असं समज होण्यामागील मुख्य कारणं म्हणजे, तुम्ही हे ज्यूस तुम्हाला पाहिजे तेव्हा पिऊ शकता. तसेच तुम्ही ऑफिस किंवा शाळेमध्येही हे अगदी सहज कॅरी करू शकता. हे सर्व खरं असलं तरिदेखील फळांऐवजी ज्यूस पिणं हा उत्तम पर्याय ठरू शकत नाही. कारण फळांमधील अनेक पोषक तत्व ज्यूस तयार करताना नष्ट होतात. तसेच पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियांमध्ये वाढ होते, त्यामुळे ज्यूसमध्ये बॅक्टेरियांचा समावेश होण्याची शक्यता असते. फळांमध्ये अस्तित्वात असणारं फायबर पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे पाणी शोषून घेण्यासाठी मदत करतं, त्यामुळे शरीर बराच काळापर्यंत हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. पण हेच जर फळांचा ज्यूस करायचं ठरवलं तर त्या प्रक्रियेमध्ये फळांमधील फायबर पूर्णपणे निघून जातात.