चहा-कॉफीने अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. काहींना चहा घेतल्याशिवाय काम करण्यासाठी तरतरी येत नाही असे म्हणतात. तर काहींना कॉफी खूप जास्त आवडते. कॉफीचे काही फायदे देखील आहेत. कॉफीमुळे थकवा, आळस निघून जातो आणि काम करण्याचा उत्साह येतो. फिल्टर कॉफी, कॅपॅचिनो कॉफी, लॅटे कॉफी, एस्प्रेसो कॉफी हे कॉफीचे विविध प्रकार सर्वांनाच माहीत आहेत. मात्र सध्या बुलेट कॉफी लोकप्रिय झाली असून शरीरासाठी ती फायदेशीर देखील आहे.
बुलेट कॉफीलाच बुलेट प्रूफ कॉफी आणि बटर कॉफी असं म्हटलं जातं. या कॉफीचं फक्त नावच नाही तर चवही थोडी हटके आहे. सेलिब्रिटींमध्ये ही बुलेट कॉफीची क्रेझ पाहायला मिळत आहे. डाएटमध्ये बुलेट कॉफीचा समावेश केल्यास ती शरीरासाठी उपयुक्त ठरत असून त्याचे अनेक फायदे आहेत. इंटरमीटेंट फास्टिंग आणि किटोजेनिक डाएट घेणाऱ्या व्यक्तींमध्ये बुलेट कॉफी प्रसिद्ध आहे. या कॉफीमध्ये प्रामुख्याने तुपाचा वापर केला जातो. वजन कमी करण्यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांसाठी ही कॉफी अत्यंत फायदेशीर ठरते.
घरच्या घरी अशी करा बुलेट कॉफी तयार
- बुलेट कॉफी तयार करण्यासाठी दोन कप पाणी, दोन टीस्पून नारळाचं तेल, तीन टेबलस्पून कॉफी आणि दोन टेबलस्पून वनस्पती तूप ही सामुग्री लागणार आहे.
- 5 ते 10 मिनिट कॉफी पाण्यामध्ये भिजवून ठेवा.
- त्यानंतर भिजवलेल्या कॉफीमध्ये नारळाचं तेल आणि वनस्पती तूप टाका.
- मिश्रण क्रिमी आणि स्मूथ होत नाही तोपर्यंत ते ब्लेंडरच्या मदतीने ब्लेंड करा.
- तयार झालेली बुलेट कॉफी लगेचच सर्व्ह करा.
बुलेट कॉफीचे आरोग्यदायी फायदे
- बुलेट कॉफीमुळे शरीराला ऊर्जा मिळते. सुस्ती किंवा थकवा आल्यास बुलेट कॉफी उपयुक्त ठरते.
- बुलेट कॉफी वजन कमी करण्यासाठी मदत करते. तसेच भूकेवर ही नियंत्रण ठेवते त्यामुळे ओव्हरइटिंगपासून बचाव करता येतो.
- बुलेट कॉफी अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्यामध्ये असलेल्या घटकांमुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
- बुलेट कॉफीमुळे पचनक्रिया चांगली राहते. तसेच इम्युनिटी सिस्टम मजबूत होते.
- बुलेट कॉफी त्वचेसाठी उपयुक्त असून अँटी-एजिंगच्या समस्या दूर करते.
- बुलेट कॉफीमुळे ब्लड सर्क्यूलेशन नीट होते. तसेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी संभवतो. कॉफीचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. जास्तीत जास्त लोकांना कॉफी प्यायला आवडते. पण जर कॉफीचे अतिप्रमाणात सेवन केलं तर आरोग्याला धोका उद्भवू शकतो. मात्र जर कॉफीचं सेवन करत असताना ते योग्य प्रमाणात केलं तर मोठ्या आजारांपासून वाचता येऊ शकतं. कॉफीच्या सेवनाने किडनीचे कार्य सुरळीत चालते. आरोग्यावर सुध्दा सकारात्मक परिणाम घडून येतो. कॉफीचे सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.