(Image Credit : FirstCry Parenting)
आपल्या देशात अनेक लोक डायबिटीजने पीडित आहेत. या लोकांना रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या आहारावर कंट्रोल करणं भाग असतं. खरं तर ज्या लोकांना डायबिटीज असतं, त्यांच्या डाएटची रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्य भूमिका असते. परंतु काही पदार्थ असतात जे डायबिटीज झालेल्या लोकांना कटाक्षाने खाणं टाळणं गरजेचं असतं. कारण काही पदार्थांमध्ये मूळतःच साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे असे पदार्थ खाल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा धोका असतो. परंतु हे पदार्थ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही असतात. त्यापैकीच एक म्हणजे अननस...
आरोग्यासाठी अननस ठरतं फायदेशीर :
अननस एक असं फळ आहे, जो अनेक व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत असतो. यांमध्ये मिनरल्ससोबतच फायबरही मुबलक प्रमाणात असतं. जे डायबिटीजच्या रूग्णांसाठी उपयोगी ठरतं. यासर्व सकारात्मक गोष्टींव्यतिरिक्त यांमध्ये कॅलरीही कमी असतात. डायबिटीजवर अनेक संशोधनं करण्यात आली. त्या संशोधनांनुसार, फायबरयुक्त डाएट घेतल्याने फक्त ब्लड शुगर कमी करण्यासाठी मदत मिळत नाही तर. त्यामुळे कोलेस्ट्रॉलही कमी होते. एवढचं नाही तर पोटाच्या समस्याही दूर होतात. अशातच डाएट वजन नियंत्रित करण्यासाठी अननस लाभदायक ठरतं. कारण यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट दिर्घकाळ भरल्यासारखं वाटतं. तसेच फॅट कमी करण्यासाठीही मदत होते.
(Image Credit : Verywell Health)
ग्लायसीमिक इंडेक्स असतं अधिक
अननसाचे अनेक आरोग्यदायी फायदे असले तरी त्याबाबतची एक समस्या म्हणजे, याची ग्लायसीमिक इंडेक्स आणि फळांच्या तुलनेत अधिक असते. ग्लायसीमिक इंडेक्स (जीआय)मध्ये पदार्थांना रॅकिंग देण्यासाठी त्या पदार्थांचं सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण किती वाढते याचा अभ्यास करण्यात येतो. ज्या पदार्थांची जीआय रॅकिंग 55 पर्यंत असते, त्यांना लो जीआय असं मानलं जातं.
डायबिटीजचे रूग्ण अननस खाऊ शकतात पण...
अननसाबाबत सर्वात मोठी समस्या म्हणजे, ताज्या अननसामध्ये, जीआय रॅकिंग 59 असतं. हे बाकी फळांच्या जीआय रॅकिंग तुलनेमध्ये जास्त असते. तसेच अननसाच्या ज्यूसमध्ये जीआय रॅकिंग ताज्या फळांच्या तुलनेमध्ये कमी असते.
पण फक्त एवढ्याच कारणामुळे हे गुणकारी फळं न खाणं योग्य नाही. डायबिटीजच्या रूग्णांनी अननस खावं की नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना तज्ज्ञांनी सांगितलं की, डायबिटीजचे रूग्ण अननस खाऊ शकतात. पण अगदी कमी प्रमाणात. ताजं अननस दुसऱ्या फळांसोबत किंवा खाद्यपदार्थांसोबत खाणं हा देखील उत्तम पर्याय आहे. अननस मलई नसणारं दही किंवा मोड आलेल्या डाळींसोबत खाऊ शकता. त्यामुळे डाएटमध्ये संतुलन राखणं हेच ब्लड शुगर कंट्रोल करण्याचा उत्तम उपाय आहे.
तुम्हीही डायबिटीजने ग्रस्त असाल तर अननस खावं की नाही? हे तुम्ही तुमच्या ब्लड शुगर लेव्हलवरून ठरवू शकता. गरज असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता. त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या प्रमाणात अननस खाऊ शकता.