शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 
3
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
4
"मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; पाटलांचा गौप्यस्फोट
5
Baba Siddique Death News : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव
6
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
7
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा
8
Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?
9
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
10
Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
11
ते 'गाडीभर' पुरावे म्हणत होते, आपल्याकडे कुणी 'सुटकेसभर'ही म्हणत नाही? सरकारच्या कारभारावर पृथ्विराज चव्हाण म्हणाले...
12
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
13
IND vs NZ, 2nd Test : शुबमन-पंत फिट; सर्फराजही फिक्स! KL Rahul ला बसावे लागणार बाकावर
14
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
15
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
16
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
17
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
18
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
19
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
20
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!

Uric Acid ची समस्या दूर करणारी टेस्टी चटणी, शरीरही आतून होईल साफ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 10:50 AM

Best Chutney For Uric Acid: आज आम्ही शरीरातील यूरिक अ‍ॅसिड कमी करणाऱ्या खास चटणीबाबत सांगणार आहोत. या चटणीचे फायदे आणि ती कशी तयार करावी हे जाणून घेऊया.

Best Chutney For Uric Acid: शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढल्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. याने शरीरात संधिवात, जॉईंट्समध्ये वेदना आणि सूज या मुख्य समस्या होतात. अशात यूरिक अ‍ॅसिड शरीरातून बाहेर काढण्यासाठी आहारात आणि लाइफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतात. यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. मात्र, आज आम्ही शरीरातील यूरिक अ‍ॅसिड कमी करणाऱ्या खास चटणीबाबत सांगणार आहोत. या चटणीचे फायदे आणि ती कशी तयार करावी हे जाणून घेऊया.

यूरिक अ‍ॅसिड कमी करणारी चटणी

कोथिंबीर - कोथिंबिरीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स गुण असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. याने यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासही मदत मिळते. 

पदीना : पदन्याचं सेवन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. पदीन्याने शरीराला थंडावा मिळतो. यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे जॉईंट्सची सूज आणि वेदना कमी करू शकतात.

आलं - आलं एक नॅचरल अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी एजंट आहे. ज्याच्या मदतीने यूरिक अॅसिडसंबंधी संधिवात आणि सूज कमी करण्यास मदत मिळते. तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो आणि यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल राहतं.

लिंबाचा रस - लिंबाच्या रसाचे शरीराला अनेक फायदे मिळतात. याने यूरिक अ‍ॅंसिडची लेव्हल संतुलित ठेवण्यासही मदत मिळते. यात व्हिटॅमिन सी मुळे शरीर डिटॉक्स होतं आणि यूरिक अ‍ॅंसिडचं अवशोषण कमी होतं.

हींग - हींगामुळे पचनक्रिया चांगली होते आणि सूज कमी करण्यासही मदत मिळते. यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे यूरिक अ‍ॅंसिडमुळे होणारी वेदना आणि सूज कमी करतात.

चटणीसाठी साहित्य

१ कप कोथिंबीर

अर्धा कप पदीन्याची पाने

१ इंच आल्याचा तुकडा

१ छोटा चमचा लिंबाचा रस

थोडा हींग 

१ ते २ हिरव्या मिरच्या

बनवण्याची पद्धत

कोथिंबीर आणि पदीन्याची पाने चांगली धुवून घ्या. आलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि पदीन्याची पाने मिक्सर ग्राइंडरमध्ये टाका. यात लिंबाचा रस, हींग आणि थोडं पाणी टाका. या सगळ्या गोष्टी चांगल्याप्रकारे बारीक करून घ्या. नंतर यात टेस्टनुसार मीठ टाका आणि पुन्हा एकदा बारीक करा. 

या चटणीचं तुम्ही रोज जेवणासोबत सेवन करू शकता. ही चटणी डाळ, चपाती, सलाद किंवा भातासोबत खाणं फायदेशीर ठरेल. या चटणीचं रोज सेवन कराल तर यूरिक अ‍ॅसिडची लेव्हल कमी होईल. सोबतच वेदना आणि सूजही कमी होईल. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स