शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नारळ खाणार त्याला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 8:36 PM

पानक पिताना आपण पन्ह पितोय का असेच सुरवातीला वाटते.

ठळक मुद्देभाकरीबरोबर कैरी उडद मेथी, चणे सुरण करी, , जीरे, मिरे कढी, पांढरा वाटाणा आणि लाल भोपळ््याची भाजी अशा काही नारळाच्या करीत केलेल्या भाज्या खाताना मजा आली. त्यामुळे जिव्हातृप्तीसाठी हे पदार्थ खायचा नक्की प्रयत्न करा.

भक्ती सोमणजागतिकीकरणामुळे पाश्चात्य जगातले बरेचसे पदार्थ आता भारतात चांगलेच स्थिरावले आहेत. किंबहुना तेच पदार्थ आवडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपल्या मातीतले, संस्कृतीतले पदार्थ टिकवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. त्यातूनच कम्युनिटी फूड ही संकल्पना संध्या जोरावर आहे. आपल्या घरी, किंवा एका ठिकाणी लोकांना बोलवून आप आपल्या प्रांतातले पदार्थ यात खिलवण्यात येतात. या कंसेप्टला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. ब्राम्हणी, सीकेपी, सारस्वत, कारवारी, मालवणी पंजाबी, अवधी, पारशी अशा कितीतरी कम्यूनिटीजच्या थाळी म्हणून तर लोकप्रिय होत आहेत. इथे तुम्हाला त्या त्या कम्युनिटीचे अस्सल चवीचे पदार्थ खायला मिळतातच. म्हणून तर अशा थाळ्यांना एक विशेष महत्व आहे.आता हेच बघा ना, नारळ घालून केलेले पदार्थ हे प्रामुख्याने कोकणपट्टी भागात जास्त आढळतात. तेच सोलापूर सारख्या भागात भरपूर प्रमाणात शेंगदाण्याचा वापर केला जातो. विदर्भात सुक्या खोबऱ्याचा वापर मसाल्यात जास्त आढळतो. असे कित्येक बदल दर कोसावर आपल्या खाद्यसंस्कृतीत दिसतात. नारळाचा सढळ हस्ते वापर कारवारी खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणावर आढळतो. कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला भाग म्हणजे कारवार. त्यामुळे इथे नारळाचा वापर जेवणात सढळहस्ते केला जातो. महाराष्ट्रीय जेवणात जसे गोडा मसाल्याला, गरम मसाल्याला महत्व असते. तसेच महत्व कारवारमध्ये नारळाला असते. आपले मसाले आपण वर्षभरासाठी करून ठेवतो. पण तिथे ताजा ताजा मसाला करावा लागतो. त्यात नारळाबरोबर धणे,चिंच, आणि लाल मिरच्यांचा वापर केला जातो. त्यामुळे पदार्थाला रंग जरी लाल आला तरी चवीला मात्र सौम्य आणि चटकदार असतात. नारळ, भात आणि मासे या तीन पदार्थांशिवाय कारवारी भोजन पूर्णच होत नाही.अशी कारवारी चवदार चव नुकतीच माधवी कामत यांच्यामुळे चाखायला मिळाली. मुळच्या कारवारच्या असलेल्या माधवी कामत यांच्या कारवारी जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी सध्या अंधेरीच्या कोहिनूर कॉन्टिनेंटलमध्ये मिळू शकते. तिथे शाकाहारी आणि मासांहारी असे अस्सल कारवारी प्रकारचे जेवण हा एक निराळा अनुभव आहे. नारळापासून इतके सुंदर आणि चविष्ट प्रकार ही या जेवणाची खासियत आहे.आपल्याकडे ज्याप्रमाणे पन्हे केले जाते त्याप्रमाणे तिकडे पानक केले जाते. पानक पिताना आपण पन्ह पितोय का असेच सुरवातीला वाटते. पण साध्या पाण्यात गूळ, वेलची पावडर, लिंबू, किंचित आलं आणि काळी व पांढरी मिरी क्रश करून हे पानक केले जाते. याशिवाय पुरणाचा सुरकुंड्या हा प्रकारही वेगळा होता. भाकरीबरोबर कैरी उडद मेथी, चणे सुरण करी, , जीरे, मिरे कढी, पांढरा वाटाणा आणि लाल भोपळ््याची भाजी अशा काही नारळाच्या करीत केलेल्या भाज्या खाताना मजा आली. असे जिव्हा तृप्त करणारे कितीतरी पदार्थ होते. मुंबईमध्ये कारवारी लोक भरपूर आहेत. पण प्रत्येकाला कारवारी जेवण करता येतंच असं नाही असे माधवी कामत यांनी सांगितले. त्यामुळे जिव्हातृप्तीसाठी हे पदार्थ खायचा नक्की प्रयत्न करा.

टॅग्स :foodअन्नMumbaiमुंबई