कॉफीचे वेगवेगळे प्रकार बाजारात बघायला मिळतात. पण यातील काही गोष्टींची काही लोकांना सवयही लागलेली असते. खासकरुन अनेकांना कॉफीची सवय झालेली असते. तर काहींना हॉट कॉफी पसंत असते तर कुणाला कोल्ड कॉफी पसंत असते. तुम्हाला कोणती कॉफी पसंत आहे? कारण एका रिसर्चनुसार, या दोन्हीपैकी एक कॉफी तुमच्यासाठी जास्त फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ कोणती कॉफी अधिक चांगली असते.
जर तुम्हाला हॉट कॉफी पसंत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. थॉमस जेफर्सन यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार, हॉट ब्रू कॉफीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाण कोल्ड कॉफीपेक्षा अधिक असतं. या रिसर्चच्या सहलेखिका मेगन फुलर यांनी सांगतिले की, ब्रू कॉफीमध्ये जास्त प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात.
मेगन यांनी सांगितले की, जर तुम्ही हॉट कॉफी योग्य प्रमाणात घेत असाल तर ही कॉफी तुमच्यासाठी फायदेशीर असते. कारण यात अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाण अधिक असतं.
अभ्यासकांना हेही आढळलं की, कोल्ड कॉफी असो वा हॉट कॉफी दोन्ही कॉफीमध्ये अॅसिडिटी लेव्हल समान प्रमाणात असते. पण कोल्ड कॉफीला लोक कमी अॅसिडिक मानतात.
आईस कॉफी आणि कोल्ड ब्रू कॉफी एकसारखी नसते. आईस्ड कॉफी तयार करण्यासाठी आधी कॉफीला ब्रू केलं जातं आणि नंतर थंड केलं जातं. तसेच ही तयार करण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला जातो.