शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मुळ्याच्या भाजीचे हे फायदे वाचल्यावर तुम्ही भाजी कधीच फेकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 11:26 AM

मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते.

(Image Credit : Foods Portal)

हिवाळा आला की, वेगवेगळ्या हिरव्या भाज्या खाण्याचा सपाटाच लावला जातो. याच मोसमात मुळाही अधिक प्रमाणात खाल्ला जातो. मुळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हा एक प्रकारचा कंद आहे. याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. पण अनेकजण मुळ्याची भाजी फेकून देतात. 

मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. कित्येक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी करतात. तर काही लोक त्याच्या मुठिया (मुटकुळी) आणि थालिपीठेही करतात. ज्याप्रमाणे मुळ्याचे आरोग्यदायी फायदे आहेत तसेच मुळ्याच्या भाजीचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मुळ्याच्या भाजीमध्ये आयर्न, कॅल्शिअम, फोलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फोरस भरपूर प्रमाणात असतात. 

डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी

मुळ्याची भाजी ही ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवते. त्यामुळे ज्यांना डायबिटीजची समस्या आहे त्यांनी मुळ्याच्या भाजीचं सेवन करावं. या पानांचा ज्यूस बनवूनही सेवन केला जाऊ शकतो. 

पोटदुखीपासून आराम

मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. इतकेच नाही तर ही भाजी खाल्ल्याने केसगळतीची समस्याही दूर होते. 

मुत्राशय स्वच्छ करते

मुळ्याची पाने मुत्राशय स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या भाजीमध्ये स्टोन डिजॉल्वची क्षमता असते. त्यामुळे यासाठी या भाजीचं नियमीत सेवन करणे फायदेशीर ठरतं.  

पाइल्सची समस्या होईल दूर

पाइल्सच्या रुग्णांनी मुळा किंवा मुळ्याच्या भाजीचं नियमीत सेवन करणे फायदेशीर ठरतं. मुळ्याच्या भाजीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्याने सूजही दूर करण्यास मदत मिळते. 

इम्यून सिस्टम करते मजबूत

मुळ्याच्या पानांमुळे इम्यून सिस्टिम मजबूत होण्यास मदत मिळते. त्यासाठी पानांची भाजी करा किंवा पराठे करा. याने शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. तसेच तुमचा थकवाही दूर होतो. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार