How to eat Kiwi fruit : कीवी हे एक शक्तीशाली फळ मानलं जातं. कारण या फळाचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जास्तीत जास्त लोक कीवी फळाची साल खात नाहीत. ते केवळ आतील गर खातात. मात्र, काही लोकांनी असा दावा केला आहे की, कीवी फळ सफरचंदासारखं कापून खावं. अशात याबाबत डॉ. एमी शाह यांनी सांगितलं की, सालीसोबत कीवी खाल्ल्याने फायबर ५० टक्के जास्त मिळतं. त्यांनी याबाबत इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी सांगितलं की, कीवीच्या सालीमुळे फोलेट म्हणजे व्हिटॅमिन बी९ चं प्रमाण ३४ टक्के वाढतं.
कीवी सालीसोबत कसं खावं?
पहिल्यांदा कीवीची साल खाणं थोडं अजब वाटू शकतं. अशात कीवी खरेदी करताना सालीवर कमी केस असलेले कीवी खरेदी करावे. कीवीच्या सालीमधून शरीराला अधिक पोषक तत्व मिळतात.
कीवीची साल कुणी खाऊ नये?
काही लोकांना कीवीची साल खाल्ल्यानंतर खाज येते. अशात डॉक्टरांनी सांगितलं की, "ही समस्या पराग खाद्यपदार्थांच्या क्रॉस रिअॅक्टिविटीमुळे होतं". ज्या लोकांना परागाची एलर्जी आहे त्यांना कीवीच्या सालीनेही एलर्जी होऊ शकते. अशात कीवीची साल काढून टाकावी.
कीवी खाण्याचे फायदे?
हार्वर्ड हेल्थनुसार, एक कीवी फळ एका वयस्क व्यक्तीची व्हिटॅमिन सी ची जवळपास ८० टक्के गरज पूर्ण करतं. डॉ. एमी शाह यांनी सांगितलं की, कीवीमुळे मूड चांगला होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. यात भरपूर फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन के असतं.