आपण अनेकदा अंड्यांबाबत हा प्रश्न ऐकला असेल की, अंडी शाकाहारी आहेत की मांसाहारी. पण तोच प्रश्न जर तुम्हाला माशांबाबत विचारला तर? थोडा गोंधळ उडाला असेल ना? गोंधळू नका. मासे हे मांसाहारीच आहेत. पण जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला मासे खायचे असतील तर आता निश्चिंत होऊन खाऊ शकता. थांबा... थांबा, घाबरून जाऊ नका. हा मासा शाकाहारीच असणार आहे.
काही दिवसांपूर्वी लंडनमधील एका चिप्स शॉपमध्ये शाकाहारी माशांसोबत बटाट्याचे चिप्स देण्याचा नवा प्रयोग मालकाने करून पाहिला. मांसाहारी नसला तरी हा पदार्थ तयार करण्याची पद्धत आणि आकार हा मांसाहारी पदार्थांप्रमाणेच होता. त्यामुळे शाकाहारी माणसं हा पदार्थ खाणं टाळत होते. त्यातील एका माणसाने तो पदार्थ खाण्याचं धाडस केलं आणि त्याची चव चाखून तो त्या पदार्थाच्या प्रेमातच पडला. त्याचं पाहून इतरही लोकं या पदार्थाचा आस्वाद घेण्याचा धाडस करू लागले. बघता बघता सर्व शाकाहारी लोकं हा पदार्थ खाण्यासाठी या हॉटेलमध्ये गर्दी करू लागले.