(Image Credit : lifealth.com)
गूळ आणि जिरे हे दोन्ही पदार्थ प्रत्येक किचनमध्ये सहजपणे उपलब्ध होतात. जिऱ्याचा वापर पदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी केला जातो. मात्र पदार्थांना चव आणण्यासोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. तेच गुळामध्येही अनेक पोषक तत्वे असतात. अशात जिरं आणि गुळाचं पाणी सेवन केल्यास वेगवेगळ्या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते.
पोटाची समस्या दूर होईल
जिरे आणि गूळ दोन्ही गोष्टी पोटाची समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाची मानले जातात. पोटदुखी, गॅस, पोट फुगणे अशा समस्या या पाण्याने वेळीच दूर होतात. याने पोटाच्या वेगवेगळ्या समस्यांतून तुम्हाला सुटका मिळेल.
वेदना कमी करण्यासाठी
पाठदुखी आणि कंबरदुखी यांसारख्या समस्यांमध्येही गूळ आणि जिऱ्याचं पाणी फार फायदेशीर ठरतं. त्यासोबतच मासिक पाळी असताना हार्मोन्समध्ये होत असलेल्या बदलांमुळे महिलांना वेगवेगळ्या समस्या होतात. या समस्यांपासूनही आराम मिळवण्यासाठी गूळ आणि जिऱ्याचं पाणी फायदेशीर ठरतं.
डोकेदुखीपासून आराम
गूळ आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्याने डोकेदुखीपासून सुटका होते. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा डोकेदुखीच्या समस्या होत असेल तर हा उपाय करणे विसरु नका. डोकेदुखी व्यतिरीक्त जिरं आणि गुळाचं पाणी ताप कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
जिरं आणि गूळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर करण्यासाठी फार चांगला नैसर्गिक उपाय आहे. याने आपल्या शरीरातील घाण स्वच्छ होते. तसेच याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. याने वेगवेगळ्या आजारांपासून लढण्यास मदत होते.
कसे बनवाल?
जिरं आणि गुळाचं पाणी तयार करण्यासाठी आधी एका भांड्यात २ कप पाणी घ्यावं. आता त्यात १ चमचा बारीक केलेला गूळ आणि १ चमचा जिरे टाका. हे मिश्रण चांगल्याप्रकारे उकळू द्यावे. त्यानंतर हे पाणी तुम्ही थंड झाल्यावर सेवन करु शकता.
रिकाम्यापोटी करा सेवन
तज्ज्ञ सांगतात की, जिरे वजन आणि वाताची समस्या कमी करतो. तर गुळाने पचनक्रिया चांगली राहते. अशात दररोज रिकाम्यापोटी १ कप जिरे आणि गुळाचं पाणी सेवन केल्यास अधिक फायदा होतो.