हिवाळ्यात गूळ खाण्याचे वेगवेगळे फायदे होतात. आयुर्वेदानुसार, गूळाच्या नियमीत सेवनाने तुम्ही अनेक रोगांना स्वत:पासून दूर ठेवू शकता. गुळाच्या मिश्रणाने तयार करण्यात आलेले चूर्ण किंवा इतरही काही पदार्थ या दिवसात हेल्दी असतात. काही लोकांना वाढत्या वयासोबत वाढणाऱ्या समस्यांमुळे गोड पदार्थ खाता येत नाहीत. पण गोड खाण्याच इच्छा तुम्ही गुळाच्या पदार्थांनी पूर्ण करु शकता.
असं करा गुळाचं सेवन
- गुळाच्या पाण्याचं सेवन रिकाम्या पोटी केल्याने शरीर मजबूत आणि शक्तीशाली होतं. सोबतच याने शरीरातील रक्तही शुद्ध होण्यास मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो आणि यामुळे हृदयाशी संबंधीत आराजही दूर होतात.
- सतत फार जास्त थकवा आणि कमजोरी वाटत असेल तर गुळाचं सेवन केल्याने ऊर्जा वाढण्यास मदत होते. गूळ पचनालाही हलका असतो आणि याने शुगरचं प्रमाणही वाढत नाही. त्यामुळे शुगरची समस्या असणाऱ्यांसाठी गूळ फायदेशीर ठरतो.
- जर तुम्हाला कमजोरी जाणवत असेल आणि तुम्हाला श्वास भरुन येत असेल तर तुम्ही गुळाचं सेवन करायला हवं. जर रोज गुळाचं सेवन कराल तर तुमची ही कमजोरी दूर होईल. तुमच्यातील ऊर्जा वाढेल. ताकद वाढवण्यासाठी तुम्ही नियमीत गुळाचं सेवन केलं पाहिजे.
- बदलेल्या आणि थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही गुळाच्या चहाचं सेवन करू शकता. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे फायबर मोठ्या प्रमाणावर असते. अस्थमा, ब्रोंकायटिस आणि एलर्जी संबंधित आजारांवर गुळाच्या चहाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त गुळ पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तम ठरतो. तज्ज्ञांच्या मते, एक व्यक्ती दररोज 5 ते 6 ग्रॅम गुळ खाऊ शकते.
डोकेदुखीपासून आराम
गूळ आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्याने डोकेदुखीपासून सुटका होते. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा डोकेदुखीच्या समस्या होत असेल तर हा उपाय करणे विसरु नका. डोकेदुखी व्यतिरीक्त जिरं आणि गुळाचं पाणी ताप कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
जिरं आणि गूळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर करण्यासाठी फार चांगला नैसर्गिक उपाय आहे. याने आपल्या शरीरातील घाण स्वच्छ होते. तसेच याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. याने वेगवेगळ्या आजारांपासून लढण्यास मदत होते.