Garlic Water Health Benefits: लसणाचा वापर हजारो वर्षांपासून वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी केला जातो. लसणाने केवळ पदार्थांची टेस्ट वाढते असं नाही तर यात अनेक औषधी गुण असतात. जे आरोग्यासंबंधी समस्या दूर करतात. लसणाचं पाणीही असाच एक नॅचरल उपाय आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही अनेक आजार तुमच्यापासून दूर ठेवू शकता. पण अनेकांना लसणाचं पाणी पिण्याचे फायदे आणि योग्य पद्धत माहीत नसते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लसणाचं पाणी पिण्याचे फायदे
१) इम्यूनिटी वाढते
लसणातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुणांमुळे शरीराची इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नियमितपणे लसणाच्या पाण्याचं सेवन केल्याने तुम्ही इन्फेक्शन आणि वायरल आजारांपासून बचाव करू शकता.
२) हृदयासाठी फायदेशीर
लसणाचं पाणी हृदयाच्या वेगवेगळ्या क्रिया सुरळीत होण्यासाठी फायदेशीर असतं. याने कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते. लसणाच्या पाण्याने वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका टाळता येतो.
३) डायबिटीसमध्ये फायदेशीर
लसणाचं पाणी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास मदत करतं. याने शरीरात इन्सुलिनचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांना खूप फायदा मिळतो.
४) वजन होईल कमी
लसणाचं पाणी मेटाबॉलिज्म बूस्ट करतं आणि भूकही कंट्रोल करतं. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील चरबी कमी करण्यास मदत मिळते.
५) बॉडी डिटॉक्स
लसणाचं पाणी हे शरीरातून विषारी तत्व बाहेर काढण्यास फायदेशीर ठरतं. ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, त्वचा चमकदार होते आणि शरीर हलकं जाणवू लागतं.
कसं बनवाल लसणाचं पाणी?
एक ग्लास पाण्यात दोन ते तीन लसणाच्या कळ्या सोलून तुकडे करून टाका. लसणाच्या कळ्या रात्रभर पाण्यात अशाच भिजून राहू द्या. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी गाळून सेवन करा आणि लसणाच्या कळ्या चावून खा.
लसणाच्या पाण्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. महत्वाची बाब म्हणजे याचे कोणतेही साइड इफेक्ट्सही नाहीत. फक्त लसणाचं सेवन खूप जास्त प्रमाणात करू नये. याने वेगवेगळ्या आजारांपासून तुमचा बचाव होईल. नियमितपणे हा उपाय कराल तर काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.