(Image Credit : The Wellness Project)
हिवाळा संपत आला की, बाजारामध्ये काकडीची आवाक वाढते. काकडी हा पाण्याचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे. काकडीच्या सेवनाने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये पाणी पिणं शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. अशातच फक्त साधं पाणी पिण्याऐवजी जर त्या पाण्यामध्ये एखादा हेल्दी पदार्थ एकत्र करू त्याचं सेवन केलं तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. काकडीचं पाणी एक उत्तम पर्याय आहे. हे एक असं पेय आहे, जे स्वादिष्ट असण्यासोबतच हेल्दी आहे. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया हे हेल्दी ड्रिंक तयार करण्याची पद्धत...
असं तयार करा काकडीचं पाणी :
एक काकडी घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर अर्ध्या काकडीची साल काढून घ्या आणि अर्धी काकडी तशीच ठेवा. काकडी स्लाइसमध्ये कापून घ्या. काकडीच्या स्लाइस एका स्वच्छ जारमध्ये टाकून त्यामध्ये पाणी भरून ठेवा. पाण्याचे प्रमाण स्लाइस अनुसार ठेवा. थोडा वेळ तसंच ठेवा. तयार पाण्याचे दोन दिवसांपर्यंत सेवन करू शकता. पण दोन दिवसांपेक्षा जास्त वेळी ठेवू नका.
श्वासांची दुर्गंधी दूर करण्यासाठी
पोटामध्ये अधिक उष्णता निर्माण झाल्यामुळे श्वासांमधून दुर्गंधी येऊ लागते. काकडीच्या पाण्यामध्ये हायड्रेटिंग प्रॉपर्टीज असतात. याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. हे पाणी पोटातील उष्णता कमी करण्याचं काम करतं. तसेच तोंडामध्ये जमा होणारे हानिकारक जीवाणू नष्ट करण्याचं कामही हे पाणी करतं.
कॅलरी नसतात
काही लोक अधिक कॅलरींच्या सेवनाबाबत चिंतीत असतात. या ड्रिंकमध्ये कॅलरीचे प्रमाण फार कमी असते. एका पूर्ण काकडीमध्ये 45 कॅलरी असतात. त्यामुळे याच्या काही तुकड्यांचे सेवन केल्याने शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण अगदी कमी प्रमाणात तयार होतात.
शरीर स्वच्छ करण्यासाठी
काकडीचे पाणी शरीरला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतं. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन, अॅन्टी-ऑक्सिडंट आढळून येतात. जे शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तुम्ही काकडीपासून ज्यूस तयार करून त्याचेही सवन करू शकता.
व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा स्त्रोत
काकडीमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्व असतात. एका काकडीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम आढळून येतात. ही सर्व पोषक तत्व आपल्य शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असतात.
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी
काकडीमध्ये आढळून येणारं सिलिका त्वचेसाठी फायदेशीर असतं. यामुळे पिम्पल्स आणि त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यासाठी मदत मिळते. खीरा चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठीही मदत करतो. तुम्ही यापासून फेस मास्क तयार करून तो चेहऱ्यावर लावू शकता. तसच याचे स्लाइस डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं दूर होण्यास मदत होते.