थंडीचे दिवस म्हटले की, वाफाळलेल्या चहा किंवा कॉफीच्या कटींगवर कटींग घेतल्या जातात. थंडीत तापमान कधी कधी फार कमी होतं आणि यामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. डोकेदुखी, सर्दी-खोकला आणि अंगदुखी या तर फारच कॉमन समस्या आहेत. काही लोक अशावेळी गरमीसाठी ग्रीन टी सुद्धा घेतात. मात्र या दिवसातील वातावरणात चहा किंवा कॉफीऐवजी काही हेल्दी ड्रिंक घेतले तर तुम्हाला त्याचा फायदाही होऊ शकतो.
हळद-दूध - हळदीमध्ये अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात जे वेदना आणि सूज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. गरम केलेल्या दुधात अर्धा चमचा हळद आणि एक चिमुट काळी मिरे पावडर टाकून दिवसातून दोनदा सेवन करा.
आल्याचा चहा - आल्यामध्ये असलेल्या तत्वांमुळे पेनकिलरसारख प्रभाव होतो आणि याने डोकेदुखीत आराम मिळतो. एक कप पाण्यामध्ये आलं चहापत्तीसोबत उलळून घ्या आणि याचं सेवन करा. याने डोकेदुखी लगेच दूर होईल.
ग्रीन टी - ‘ग्रीन टी’मध्ये असणारे अॅन्टीबॅक्टेरिअल घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला नेहमी नेहमी येणारा ताप, अंगदुखीही दूर होण्याची शक्यता असते.
कहवा किंवा कहावा - कहवा हे आरोग्यासाठी एक फायदेशीर जडी-बुटी मानली जाते. मुळात चहाचा काश्मीरी प्रकार आहे. एक कप पाण्यात चवीनुसार साखर टाका, त्यात केसरची पाच-सहा पाने टाका, तीन ते चार वेलची दाणे, १ चमचा चहापत्ती आणि दोन-तीन कापलेले बदाम टाका. हे मिश्रण चांगलं उकळू द्या आणि नंतर सेवन करा.